
दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी-शिवकुमार बिरादार
मुखेड शहरातील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बाल विकास केंद्र ( दिंडोरी प्रणित ) या ठिकाणी अतिशय उत्साहात श्री स्वामी समर्थ जयंती व नगर प्रदक्षिणा उत्सव शांततेत गुरुवार दि.23 रोजी साजरा करण्यात आला आहे. दरवर्षी चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबविले जातात . त्याच प्रथा , परम्परेनुसार दि. 23 मार्च रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .
सकाळी स्वामी याग करून 8 च्या आरतीनंतर श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बाल विकास केंद्र , नागेंद्र मंदिर याठिकाणाहून निघून हेडगेवार चौकातील गणपती मंदिर , बालाजी मंदिर , भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँकेजवळून , मारोती मंदिर चौकातून मुख्य बाजारपेठेतून , झेंडा चौकातील बालवीर हनुमान मंदिरापासून , विठ्ठल रखुमाई मंदिर ते हुतात्मा माधव एकलारे चौकात पालखी सोहळ्याचे आगमन झाले . त्यानंतर स्वामी समर्थ केंद्राच्या ठिकाणी नगर प्रदक्षिणा पालखीची सांगता झाली .
या कार्यक्रमात ढोल ताश्यांचा पथक , महिलांचे मंगल कळस , नामघोष , फुगडी , टाळ, मृदंग , भजन , पाऊले टाकत , सुंदर आकर्षक रांगोळी व वेशभूषेत श्रीपाद श्रीवल्लभ , नरसिंह सरस्वती , श्री स्वामी समर्थ महाराज , मोरे दादा , पिठले महाराज आणि गुरु माऊलीच्या भूमिकेत बाल गोपाळ , महिला भगिनी , पुरुष सेवेकरी तल्लीन होऊन नामस्मरण व भजनाद्वारे नगरातील प्रमुख रस्त्यावर पालखी सोहळा संपन्न झाला.
या जयंतीनिमित्त मुखेड व परिसरातील अनेक अबाल , वृद्ध , व्यापारी , राजकीय नेते , प्रतिष्ठित नागरिक , स्त्री , पुरुष सेवेकऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती .