
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:- राज्याचे आरोग्य मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. ना. तानाजीराव सावंत यांच्या अध्यक्षतेखाली २७ मार्च २०२३ रोजी सकाळी १० वाजता भूम येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. जनता दरबार वेळी सर्व शासकीय विभाग प्रमुखांना आद्यवत माहितीसह हजर राहण्याचे आदेश देण्यात आले,असून कोणीही गैरहजर राहणार नाही याची खबरदारी घ्यावी असे निर्देश देण्यात आले आहेत. जनता दरबारामुळे तालुक्यातील नागरिकांच्या विविध कार्यालयात रखडलेल्या कामे मार्गी लागणार असून या जनता दरबाराचा लाभ तालुक्यातील सर्व नागरिकांना घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासन तसेच तालुका प्रमूख बालाजी ( बापू) गुंजाळ यांनी केले आहे.