
दैनिक चालु वार्ता ग्रामीण प्रतिनिधी- माणिक सुर्यवंशी
भारतीय सण हे निसर्गाशी निगडीत आहेत तर पाश्चात्य देशात सण हे व्यक्तीशी निगडित आहेत. सद्यस्थितीत आपल्या देशात त्याच अनुकरण युवकांकडून केलं जात आहे हे आपलं दुर्भाग्यच म्हणावं लागेल.पुन्हा एकदा आपणाला निसर्गाकडे चला असे म्हणणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापक संतोष कोल्हे यांनी केले.
G-20 2023 ची जागतिक परिषदेची अध्यक्षता भारताला मिळाल्यामुळे संपूर्ण देशात एनसीसी कडून G- 20 च्या उद्देशानुसार पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.त्या अनुषंगाने मानव्य विकास विद्यालयात एनसीसी विभाग व राष्ट्रीय हरित सेना विभागाच्या संयुक्त विद्यमाने सदरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यात विद्यार्थ्यांचे वक्तृत्व स्पर्धा व प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात शाळेचे मुख्याध्यापक संतोष कोल्हे पुढे म्हणाले की वृक्षारोपण करताना भारतीय वृक्षांचीच लागवड करावे त्यानेच पर्यावरणाचे रक्षण होईल.
निसर्गाला जपले तरच आपले भविष्य सुरक्षित राहील.त्याचबरोबर आपल्या अवतीभोवती असलेले छोटे-मोठे तलावाचे संरक्षण करणे तसेच मधमाशांचे जतन करणे गरजेचे आहे.तरच आपले निसर्गचक्र आणि अन्नचक्र टिकून राहील.
यानंतर राष्ट्रीय हरित सेनेचे अध्यक्ष शिवानंद स्वामी यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून शाळेच्या हरित सेनेच्या वतीने शाळेच्या वतीने राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमाची माहिती देऊन विद्यार्थ्यांना एक मूल-एक झाड ही संकल्पना राबवण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संतोष कोल्हे हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे पर्यवेक्षक शरद हांद्रे,वक्ते म्हणून शिवानंद स्वामी, एनसीसी विभाग प्रमुख गिरीश पारसेवार हे उपस्थित होते.
कार्यक्रमात एकूण 20 विद्यार्थ्यांनी भाषण केले तर 48 विद्यार्थ्यांनी प्रश्न मंजुषा स्पर्धेत भाग घेतला.
कार्यक्रमास शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्याम कोल्हे, सुशील जांबकर,एनसीसी विभाग प्रमुख गिरीश पारसेवार आदींनी परिश्रम केले.