
दैनिक चालु वार्ता मोखाडा प्रतिनिधी – सौरभ कामडी
मोखाडा – पालघर जिल्ह्यामध्ये अनेक तालुके आहेत आणि या तालुक्यामध्ये विविध जिल्हा परिषद शाळा आहेत आणि या शाळेमध्ये अनेक समस्या असतात अश्याच प्रकारे या जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी भाग असलेली मोखाड्या तालुक्यातील सावर्डे शाळेला आयएसओ मानांकन मिळाले . सावर्डे गावात जाण्यासाठी 2019 ला रस्ता झाला असून सावर्डे येथे 1ली ते 5वी पट 42 असून 4 वर्षा पासून 1 शिक्षक कार्यरत आहे. ग्रामस्थांना शाळा
डिजीटल होईल की नाही विश्वास नव्हता परंतु तेथील मुख्यध्यापक श्री संतोष बोंद्रे सर यांनी शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांच्याशी उत्तम संपर्क ताळमेळ साधून मित्र, विविध संस्था आणून शाळेला एक अंतरंग बाह्यरंग बदलून गुणवत्ता वाढवण्यास प्राध्यान्य दिलं .व शाळा आयएसओ मानांकन मिळवण्याचा ध्यास घेउन शाळा 19 मार्च 2023 आयएसओ मानांकन प्राप्त केले. त्याची दखल घेऊन मा. प्रकशजी निकम साहेब ,(अध्यक्ष,) राज्यमंत्री दर्जा.जिल्हा परिषद पालघर यांनी सावर्डे शाळेला व व्यवस्थापन समिती निमंत्रित करून सत्कार करून प्रमाणपत्र देण्यात आले.