दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
आज केंद्रीय मंत्री मा.नामदार श्री.रावसाहेब पाटील दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा जिल्हाध्यक्ष आ. संतोष पाटील दानवे व माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली “स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा” काढण्यात आली..
तेव्हा समस्त जालनामध्ये ‘आम्ही सारे सावरकर’ ही चेतना निर्माण झालेली पाहायला मिळाली. सावरकर गौरव यात्रा ही केवळ एक यात्राच नव्हे, तर स्वा. सावरकरांच्या ज्वलंत विचारांची ज्योत भारतीयांच्या मनामनात तेवत ठेवण्यासाठी काढलेली एक मोहीम आहे.
सावरकरांनी एके ठिकाणी म्हटलंय, ‘शुद्धीचे कार्य हे केवळ धार्मिक नाही, ते राजकीयही आहे’! काही काँग्रेसमधील इतिहासशून्य राजकीय लोकांच्या बुद्धीचे शुद्धीकरण करण्यासाठीच आम्ही ही गौरव यात्रा जालनामध्ये काढली. आज या भव्य गौरव यात्रे मध्ये सहभागी झाल्या नंतर ठिकठिकाणी सावरकरप्रेमींशी संवाद साधला. मोठ्या संख्येने आबालवृद्ध आणि विशेषतः युवा वर्ग या यात्रेत उपस्थित होता.
