दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
नांदेड/जोमेगांव ता. लोहा जि. नांदेड येथे लघु पाटबंधारे अंतर्गत जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडून तिस वर्षापासून तलाव केला गेला आहे.परंतु त्या तलावात मोठमोठे काटेरी झाडे वाढली आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे.पाळुवर मोठे झाडे झाल्यामुळे तलावाला तडे जात असून भेगा पडत आहेत.पिचींगचे काम बाकी राहिले आहे आणि सांडव्याचे काम करणे गरजेचे आहे.पाणी गळती सतत चालू आहे. तलावाच्या खालच्या बाजूला शेती व शेतकऱ्यांचे आखाडे आहेत. शेतकऱ्यांना भीती निर्माण झाली आहे. या वर्षी पाणी पातळी कमी झाली असून ते त्वरित दुरूस्ती करून गाळ व झाडे काढावे व होणारा धोका टाळावा ही सर्व गावकरी व शेतकऱ्यांची मागणी आहे.तसेच सतत याबाबत शासनास पाठपुरावा करून ही अद्यापपर्यंत
कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना फार अडचणी निर्माण झालेली आहे. एखादी मोठी दुर्घटना होऊ शकते. याची सर्व जबाबदारी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांची राहील . नुकसान होण्याची वाट न पाहता लवकरात लवकर दुरूस्ती करून देण्याची मागणी सरपंच गंगाबाई व भास्करराव पाटील शिंदे जोमेगांवकर सरचिटणीस नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी नांदेड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन तलाव दुरूस्ती करून झाडे व गाळ काढण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे.
