
दैनिक चालू वार्ता निलंगा प्रतिनिधी- इस्माईल महेबूब शेख.
====================
निलंगा: मागील 75 वर्षा पासून आपल्या देशा मधे काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष,भाजपा आणि त्यांचे मित्र पक्ष राज्य करत आलेले आहेत, करत आहेत.परंतु वरील पैकी दोन्ही हि प्रमुख राजकीय पक्षांनी किंवा त्यांच्या इतर मित्र पक्षांनी वाहन चालकांच्या व वाहन मालकांच्या समस्यांकडे लक्ष दिलेले नाहि.उलट पक्षी आपल्या मागण्या कडे दूर्लक्ष करूण वेळोवेळी त्यांच्या मना प्रमाणे त्यांनी टैक्स,इंन्सुंरन्स तसेच दंडात्मक कार्यवाही मधे भरमसाठ वाढ केली आहे.वरील सत्तेतील सत्ताधारी पक्षांनी जेव्हा जेव्हा त्यांची मनमानी केली तेव्हा तेव्हा त्यांच्या विरोधातील विरोधी पक्षांनी देखील प्रखर विरोध करूण वाहन चालक, चालक मालकांची बाजू मांडली नाहि.
मित्रहो आपण सर्व पहातच आहात की चालकांची विश्रांती हिच सर्वांची सुरक्षा हा मुद्दा घेऊन आपण वाहन चालकांच्या विश्रांतीसाठी प्रत्येक धार्मिक स्थळी व पर्यटन स्थळी विश्रांतीची स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी,दलित आदिवासी समाजा प्रमाणे एखादा कठोर कायदा करूण वाहन चालकांना सुरक्षा देण्याचा सरकारने प्रयत्न करावा,वाहन चालकाचा आपघाती मृत्यु झाल्यास त्याच्या कुटू़बियांना 25 लाख रूपये व कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास कमीत कमी दहा लाख रूपये सरकारच्या वतीने आर्थिक सहाय्य करण्यात यावे,ईतर राज्या प्रमाणे महाराष्ट्र राज्यात देखील मँक्सी कँबचे परमिट देण्यात यावेत या व इतर मागण्यांसाठी आपण सतत निवेदन,मोर्चे,आंदोलन करूण पाठ पुरावा करत आलेलो आहोत.वाहन चालकांच्या सर्वांगींन विकासासाठी आर्थिक महामंडळ स्थापन करण्यात यावे तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते आपघात योजना 30 हजारा वरूण 1 लाख रूपये करण्याची तर महाराष्ट्र राज्य सरकारने नागपुर येथे हिवाळी अधिवेशना मधे घोषणा करूण देखील त्याची आमल बजावणी केली नाहि.परंतु मागणी नसतांना देखील महिलांचे तिकीट अर्ध्यावर करूण सत्तेतील शिवसेना भाजपाच्या सरकारने आपल्या सर्वांच्या ताटा मधे माती कालवली आहे.
जो पक्ष विरोधात बसतो तो खुपच काहि शेतकर्याच्या काळजीचा आहे आसे दाखवून पार बेंबीच्या देठा पासून शेतकर्यासाठी सरकार हे करत नाहि,ते करत नाहि आसे ओरडत राहतो.मात्र सत्तेत आल्यावर विसरून जातो.हा प्रकार आपण मागील सत्तर पंचाहत्तर वर्षा पासून पहातो आहोत.परंतु तेलंगाना राज्यातील बी.आर.एस च्या पक्षाने मात्र तेलंगनातील शेतकऱ्यांसाठी दरवर्षी एकरी दहा हजार रूपये आर्थिक मदत चालू केली आहे.24 तास मोफत वीज देत आहे.शेतकर्यांसाठी पाच लाख रूपयाचे विमा कवच देऊन बी आर एस हे सरकार खरे शेतकर्यांचे सरकार आहे.हे त्यांनी त्यांच्या कृती मधुन दाखवून दिले आहे.मात्र आपले शिवसेना भाजपाचे सरकार आपल्या वाहन चालक ,चालक मालकांच्या जनू काहि मुळावरच ऊठलेले दिसत आहे.सदरचे सरकार आपले पोषण करायचे सोडून इ चालान सारखे कायदे करुण शोषणच करत आहे.करीता आता आपण पण सर्वांनी विचार करायला हवा की आपल्याला वाटानण्याच्या अक्षदा वाटणार्या पक्षाची तळी उचलून उदो उदो करत रहायचे की जो आपल्या भल्याचा विचार करील त्याचा सोबत जायचे.
मी माझे मत मांडले आहे.आता माझ्या विचारावर विचार करण्याची व निर्णय घेण्याची वेळ तुमची आहे.मी संजय हाळनोर संस्थापक अध्यक्ष जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था प्रणित जय संघर्ष वाहन चालक, चालक मालक संघटना कार्यक्षेत्र भारत आज पण तुमच्या मताशी सहमत आहे व उद्या पण तुमच्याच मताशी सहमत आसेल.
दि.14/4/2023 रोजी छत्रपती संभाजीनगर येथील हाँटेल रामा इंटर नैशल मधे जय संघर्ष वाहन चालकांच्या,चालक -मालक संस्था/ संघटनाचे
संस्थापक अध्यक्ष श्री संजय हाळनोर समिती सदस्य अब्बास खान,रमेश कोलते,रविंद्र कोलते,रविंद्र शेळके,सोमनाथ गायकवाड, रविंद्र आढाव, ज्ञानेश्वर हाळनोर या सर्वांची BRS या पक्षा मधे प्रवेश करण्या बाबत चर्चा झाली.
चर्चे मधे BRS पक्षाचे बोदान विधायक अध्यक्ष शकिल अहेमद,सिंचन महामंडळाचे अध्यक्ष वेणूगोपालचारी कन्नड तालुक्याचे माजी आमदार श्री हर्षवर्धन जाधव यांची उपस्थिती होतीअसे जय संघर्ष संघटनेचे लातूर जिल्हा अध्यक्ष नयूम शेख वलांडिकर यांनी कळवले.