
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-अमरावती शहरात आयपीएल मधील क्रिकेट बेटिंग करणारे सटोरी पोलिसांनी गोवा व अमरावती येथून जेरबंद केले आहे,कारवाईत एक मारुती सुझुकी कार,ऑनलाईन आयडी वरून बेटिंग करण्या साठी वापरण्यात आलेले विविध कंपनीचे ४ अँड्रॉईड मोबाईल,क्रिकेट बेटिंग घेण्यासाठी ८ मोबाईल,५ कॅल्क्युलेटर,६ वेगवेगळ्या कंपनीचे क्रेडिट व डेबिट कार्ड,तसेच ५० हजार रोख असा एकूण १५ लाख २ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.कारवाईत आयुष नरेंद्र शर्मा व करण राजेश गुप्ता याला अमरावती येथून तर राजू ठाकुरदास बांगडी याला गोवा येथून अटक करण्यात आली.या कारवाई संदर्भात पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी अधिक माहिती दिली.