
दैनिक चालु वार्ता प्रतिनीधी -अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा) प्रतिनिधी: तालुक्यातील बोरखेडी(बांबर्डा)येथे बहुजन बहुल गावात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने साजरी करण्यात आली यात आंबेडकरी गायक नितीन तायवाडे यांच्या संचाचा गायनाचा प्रबोधनात्मक कार्यक्रम, भोजनदान कार्यक्रम, पंचशील ध्वजवंदन आणि ध्वजारोहण अश्या विविध कार्यक्रमाचा समावेश आहे तर आंबेडकरी जयंती विचारपुष्प प्रा.डॉ.प्रशांत धनविजय,प्रा.डॉ.कवरासे,माजी नगरसेवक सुरेश काळबांडे,पत्रकार अवधूत शेंद्रे,माजी पोलीस पाटील पुंडलिकराव कुंभरे यांनी मांडलेत यावेळी डॉ.तुषार नायकूजी हजर होते कार्यक्रमाचे संचालन अरुण नेहारे(थार) तर आभार प्रदर्शन व जयंती कार्यक्रमाची आवश्यकता शिक्षक नामदेव नायकूजी यांनी मांडली कार्यक्रमाचे मुख्य आयोजक म्हणून चंद्रशेखर तायवाडे यांनी भूमिका बजावली तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रा.पं.सदस्य किशोर कुंभरे, सुधाकर तायवाडे,उमेश खंडारे, मनोहर धुर्वे,अनंता वानखेडे,अक्षय भागानगरे, श्रावण तायवाडे,रामेश्वर तायवाडे, सुनील परतेती, भाऊराव करनाके, शामराव सयाम,पवन तायवाडे, देवा करनाके,सुरेश सिराम यांनी परिश्रम घेतले