
दैनिक चालू वार्ता भुम प्रतिनिधि-नवनाथ यादव
भुम :- शहरातील पोलीस ठाणे येथे रमजान ईद निमित्त मुस्लिम समाजातील विधवा, निराधार तसेच अत्यंत गरीब परिस्थिती असलेल्या व गरजू कुटुंबातील महिलांना इतरांप्रमाणे रमजान ईद साजरा करता यावा म्हणून किराणा साहित्याचे ७० किट तयार करून निराधार मुस्लिम महिलांना भुम पोलीस स्टेशनच्या वतीने छोटीशी मदत म्हणून वाटप करण्यात आली. तसेच रमजान ईदच्या सर्व महिलांना शुभेच्छा देऊन त्यांच्या अडिअडचणी जाणून घेत, महिला सुरक्षा व जातीय सलोखा कायम ठेवणेबाबत मार्गदर्शन करून त्यांना कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास त्यांच्या तक्रारी सोडविण्यासाठी पोलीस सदैव तत्पर असलेबाबत पोलीस ठाणे येथील प्रभारी पोलीस अधिकारी मंगेश साळवे यांनी सांगितले. यावेळी भूम पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी तसेच मुस्लिम बांधव, महिला उपस्थित होते.