
दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनीधी -दशरथ आंबेकर
महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील ईस्लापुर शाखा व्यवस्थापक यांची नकत्यांच बदल्या झाल्या असुन,येथील शाखेत शाखा व्यवस्थापक म्हणूनअक्षय चौधरी यांनी पदभार स्विकारलाअसुन,या पुर्वी त्यांनी माहुर येथील शाखेत व्यवस्थापक म्हणून काम पाहिले माहुर येथे त्यांनी उत्कृष्ट सेवा देवुन शेतकरी, व्यापारी,बचत गट याचे मेळावे घेऊन बँकेची सखोल माहिती दिलीआहे.खातेदार यांच्याशी प्रामानिक सेवा देवुन,कमी कालावधीत नाव लौकीक मिळवला आहे.व्यवस्थापकअसताना सुध्दा त्यांनी रोखपाल म्हणून सेवा केलीआहे.या कार्याची पावती म्हणून त्याची पदोन्नतीवर ईस्लापुर येथे बदली करण्यात आली असताना संयमी व हुशारअसल्याने ते ईतर बॅकेत परीक्षा देतआहेत.त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र ग्रामीण बॅकेचे पुर्वीचे शाखा व्यवस्थापक सौरभ थुटे यांनीआर.बी. आय.मुंबई येथे रुजू झालेआहेत. येथील शाखा सहाय्यक व्यवस्थापक राहुल बेदुंले याची बदली शिरड शहापुर येथे झाल्याने,त्यांना निरोप दिला तर नवीन शाखा व्यवस्थापकअक्षय चौधरी यांचा सहाय्यक व्यवस्थापक शुभम रामटेके, रोखपाल प्रसाद मुगटकर,उत्तम गायकवाड यांनी शाल,श्रीफळ,हार, देवुन शाखेत सत्कार केला.यावेळी व्यापारी राजेश्र्वर तुप्तेवार,महाराष्ट्र ग्रामीण बॅकेचे बि.सी.गणेश जयस्वाल,पत्रकार दशरथ आंबेकरसहअनेक जण उपस्थित होते.