दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे/इंदापूर: तसं पाहिलं तर संतोष हिंगाणे साहेब यांनी खूप परिश्रम अथक परिश्रम आई-वडिलांनी घेऊन संतोष हिंगाणे साहेबांना पाठबळ दिलं या यशामागे त्यांचे कैलास वाशी अशोक हिंगाणे वडील आहे छोटे बंधू विघ्नेश हिंगाणे आज आमच्या संतोष हिंगाणे साहेबांचा गाव निमगाव केतकी असून आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे खूप अभ्यासू व हुशार व्यक्तिमत्व असून आम्ही त्यांचा सावता परिषदेचे प्रदेश मुख्य संघटक संतोष राजगुरू यांनी फेटा हार देऊन सत्कार केला व संत शिरोमणी सावता माळी महाराजांच्या चरणी प्रार्थना केली की संतोष हिंगाणे साहेबांना अजूनही चांगल्या प्रकारे यश प्राप्त होऊन त्यांच्या या ऑफिसच्या कामामध्ये त्यांच्या हातून चांगली सेवा घडो .
सावता परिषदेचे प्रदेश मुख्य संघटक संतोष राजगुरू बोलताना म्हणाले की संतोष हिंगाणे साहेबांना जी पदोन्नती मिळालेले आहे ते आमच्या गावचे आहेत. निमगाव केतकीचे आहेत निमगावकरांना त्यांचा सार्थ अभिमान आहे म्हणून आम्ही सावता परिषदेच्या वतीने त्यांचा सत्कार केला.या वेळी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक विजय हेगडे. श्री गणेश पतसंस्थेचे चेअरमन किशोर पवार केतकेश्वर पतसंस्थेचे चेअरमन गोरख आदलिंग, सुवर्ण युग गणेश मंदिर ट्रस्ट विश्वस्त दशरथ बनकर, राष्ट्रवादीचे नेते सुवर्ण युग गणेश मंदिर ट्रस्टचे विश्वस्त भारत मोरे ,हिंदी अध्यापक संघाचे नेते सुधाकर भोंग , निमगाव ग्रामपंचायतचे मा उपसरपंच अशोक मिसाळ, मा ग्रामपंचायत सदस्य शंकर मिसाळ, राजाराम अदलिंग, युवक नेते चंद्रकांत शेंडे, प्रभाकर शेंडे, ज्येष्ठ नागरिक विकास सोसायटीचे व्हाइस चेअरमन विजयजी महाजन, दादासाहेब भिसे, ज्ञानदेव मोरे, मसु वडापुरे, विकास सोसायटीचे संचालक महादेव शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
