
दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा उपसंपादक- दीपक कटकोजवार
चंद्रपूर महानगरा समीप हिंदुस्तान लालपेठ कॉलरी प्रभाग क्रमांक 16 मधील शासकीय गोदाम, पंचशील चौक, दवे चौक, ढिवर मोहल्ला, बाबूपेठ वार्डातील नागरिकांनी माजी नगरसेविका सौ कल्पनाताई बगुलकर यांना “बाबूपेठ डब्लू सी एल साइडिंगचे लांबीकरण करत असलेले काम बंद करा” अशी मागणी वार्डातील नागरिकांनी निवेदनाद्वारे केली. या संदर्भात माजी नगरसेविका सौ.बगुलकर यांनी महाराष्ट्राचे राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना हि समस्या कळविली. लगेच नामदार श्री.मुनगंटीवार यांनी चंद्रपूर महानगर भाजपा अध्यक्ष मंगेश गुलवाडे, माजी उपमहापौर राहुल पावडे, ब्रिजभूषणजी पाझारे आदिंना या संदर्भात स्पॉट व्हिजिट करून संबंधितांना सूचना करण्याचे आदेश दिले. स्पॉट व्हिजिट दरम्यान साइडिंगचे काम डब्लू सी एल अंतर्गत येत असल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याचे डब्ल्यू सी एल जनरल मॅनेजर श्री वैरागडे साहेब यांच्यासोबत भाजपा पदाधिकारी व वार्डातील शिष्ट मंडळ यांच्या समवेत बैठक घेण्याच्या सूचीत केले. डब्लू सी एल जनरल मॅनेजर यांच्यासोबत बैठकीत वार्डातील नागरिकांची चर्चा करण्यात आली. अनेक महत्वपूर्ण विषय भाजपा पदाधिकारी व जनतेकडुन जनरल मॅनेजर यांच्या समक्ष मांडण्यात आले. वैरागडे साहेबांनी साईडींगचे काम संबंधित विषयावर तोडगा निघेपर्यंत काम बंद करण्याचे आदेश दिले. यावेळी मंगेश गुलवाडे व राहुल पावडे व सौ कल्पना बगूलकर यांनी रेल्वे विभागासोबत बैठक घेण्यासाठी सन्माननीय मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार लवकरच बैठक घेण्यात येईल असे जनतेला आश्वासीत केले. संपूर्ण ताकतीने भारतीय जनता पार्टी जनतेच्या सोबत असल्याचा विश्वास दिला.
यावेळी प्रामुख्याने महानगरा भाजपाध्यक्ष मंगेश गुलवाडे, माजी उपमहापौर राहुल पावडे, चंद्रपूर जिल्ह्याचे डब्ल्यू सी एल जनरल मॅनेजर वैरागडे साहेब, माजी नगरसेवका सौ कल्पना बगूलकर, लालपेठ डब्ल्यू सी एल सब ऐरीया मॅनेजर पोडे साहेब आणी वार्डातील महेश कातकर, वामनराव शेंडे, नंदकिशोर बगूलकर, विपुल मजूमदार, मधूकर ऊमरे, सौ कमलाबाई मडावी, श्रीमती रूपा मसराम, ताराबाई अलोणे, उषाबाई खोब्रागडे, अल्काबाई आत्राम, धोटेताई, बारसागडे ताई, लताबाई खूटमाटे, विमलाबाई गफरे, कुसूम जांभुळकर, हर्षा दूर्गे, अनिल पाटील, सुनिल पाटील, भैय्याजी कांबळे, नितिन देशकर, नरेश खोब्रागडे यांचेसह असंख्य नागरिक उपस्थित होते.