
दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनीधी -समीर मुल्ला
सामाजिक काम करताना कोणताही भेदाभेद पाळणे चुकीचे आहे. निस्वार्थपणे व कोणत्याही परताव्याची अपेक्षा न करता केलेले सामाजिक कार्य खऱ्या अर्थाने मानसिक समाधान देणारे ठरते. असे कार्य करणाऱ्या मंडळीचा सन्मान करणे ही सुद्धा एकप्रकारे सामाजिक उतराई असल्याचे मत कळंबचे माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी व्यक्त केले.
येथील कळंब तालुका मराठी पत्रकार मंडळाच्या वतीने शहरातील संत ज्ञानेश्वर बालक आश्रमात सामाजिक कार्यकर्ते शिवाजी शिरसट यांचा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर कार्यगौरव सन्मान देऊन मुंदडा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष धनंजय घोगरे होते.हभप महादेव महाराज अडसूळ, संभाजी ब्रिगेडचे अतुल गायकवाड,माजी नगरसेवक सुनील गायकवाड,पार्श्वनाथ बाळापुरे,परमेश्वर पालकर,शिवाजी गिड्डे, बालाजी निरफळ, शीतलकुमार धोंगडे, भिकाजी जाधव, संभाजी गिड्डे, प्रदीप यादव,बालाजी अडसूळ, आश्रुबा कोठावळे, प्रवीण तांबडे, प्रशांत पडवळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना मुंदडा पुढे म्हणाले की, समाजासाठी निःस्वार्थपणे काम करणाऱ्यांची संख्या नगण्य आहे. काही मंडळी असे कामे करणार्यांनाही आडकाठी आणतात. त्यामुळे ज्यांना समाजकार्य करायचे आहे त्यांनाही नाउमेद व्हावे लागतेय. अशांचा पाठीमागे उभी राहण्याची मंडळाची भूमिका कौतुकास्पद आहे.’यावेळी महादेव महाराज अडसूळ, अतुल गायकवाड सुनील गायकवाड यांनीही विचार मांडले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन परमेश्वर पालकर तर आभार भिकाजी जाधव यांनी मानले. कार्यक्रमास नागरिकांची उपस्थिती होती.