
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा-सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा व्हॉइस ऑफ मीडियाचे विविध मागण्यासाठी मंठा येथील तहसील कार्यालवर धरणे आंदोलन करण्यात आले यावेळेस तहसीलदारांना दिलेल्या नियोजनात असे म्हटले आहे की वृत्तपत्रे आणि पत्रकारांच्या न्याय मागण्यांबाबत माध्यमांकडे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पहिले जाते. निवेदनात पुढे असे म्हटले आहे की मात्र मध्यमकर्मीच्या प्रश्नांच्या सोडवणुकीच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात नाहीत. आम्ही व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून आज राज्यव्यापी आंदोलनाच्या माध्यमातून खालील मागण्यांकडे आपले लक्ष वेधत आहोत .
१) पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करुन त्याला भरीव निधी द्यावा. २) पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी.
३) वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागू असलेला जीएसटी रद्द करावा. ४) पत्रकारांच्या घरांसाठी म्हणून विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा.
५) कोरोनात जीव गमावलेला पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर चा दर्जा देऊन त्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे.
६) शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण क वर्ग दैनिके (लघु दैनिक) यांना मारक आहे. लघु दैनिकांनाही मध्यम ( ब वर्ग) दैनिकांइतक्याच जाहिराती देण्यात याव्यात. साप्ताहिकांनाही 1) दैनिकांइतक्याच जाहिराती देण्यात त्या प्रमाणात जाहिराती द्याव्यात.
या मागण्यांसाठी आम्ही आज आपल्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले आहे. तरी आपण आमच्या या मागण्या आपल्यामार्फत शासनाच्या स्तरावर पाठवाव्यात आणि आम्हाला आणखी तीव्र आंदोलन करण्याचे पाऊल उचलावे लागू नये या निवेदनावर व्हॉइस ऑफ मीडियाचे मुख्य मार्गदर्शक बाबासाहेब कुलकर्णी, सल्लागार प्रदीप देशमुख अध्यक्ष अनिल बा खंदारे, उपाध्यक्ष रविंद्र भावसार, उपाध्यक्ष मंजुषा काळे, कार्याध्यक्ष सुरेश दवणे कोषाध्यक्ष अतुल खरात सरचिटणीस शेख आशपाक, गजानन माळकर आधी पत्रकारांची स्वाक्षरी आहे