
दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनीधी-समीर मुल्ला
तालुक्यातील मंगरूळ ते खामसवाडी रस्त्यावर गेल्या पंधरा दिवसा खाली झालेल्या वादळी वारे आणि पावसामुळे खामसवाडी ते मंगरूळ रस्त्यावर मोठ मोठी झाडे झुडपे पडली होती. त्यातील काही झाडे हे शेतकऱ्यांनी काढली होती परंतु सद्यस्थितीत अनेक झाडे अशाच पद्धतीने रस्त्यावर पडली असल्यामुळे सदरील मार्गावरील वाहतूक अडचणीत येत आहे.तर याचा वाहनधारकांना त्रास होत आहे. या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे साफ दुर्लक्ष असल्याचे या वरुन दिसत आहे. तर या रस्त्याने कळंब तालुका असल्याने तालुक्याला जान्यासाठी जवळचा मार्ग असल्याने दुचाकी सह मोठ्या वाहनांची वर्दळ या रस्त्यावर होत आहे. त्यामुळे सदरील झाडे तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरुन हटवण्याची मागणी वहान चालकातून होत आहे.