
दैनिक चालू वार्ता छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधि :अन्वर कादरी
छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती सर्वपक्षीय संघटनांतर्फे संभाजीनगरात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी समितीच्या कार्यकारिणीच्या सदस्यांसह शिवसेना पक्षाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय, जय जिजाऊ जय शिवराय, शिवा की जय बोलो संभा की जय बोलो व तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय अशा शिवभक्तांच्या घोषणांनी येथील परिसर दमदमुन निघाला. समितीच्यावतीने काढण्यात आलेल्या मिरवणुकीत विरोधी पक्षनेते नेते अंबादास दानवे यांनी पारंपरिक पद्धतीने फुगडी खेळली व नृत्य केले.यावेळी सर्व परीसर शिवभक्तांच्या उपस्थितीने आनंदून गेला होता.
यावेळी जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, महापौर नंदकुमार घोडेले, प्रभाकर मते पाटील, संतोष जेजुरकर, जयवंत ओक, अनिल पोलकर, राजु वैद्य, विश्वनाथ स्वामी, बाबासाहेब डांगे, वीरभद्र गादगे, मकरंद कुलकर्णी, किशोर नागरे, सिताराम सुरे, सुरेश कर्डिले, वामनराव शिंदे, रमेश गायकवाड, ज्ञानेश्वर शेळके, गोपाल कुलकर्णी, शिवानंद भानुसे, विजय शिंदे पुरुषोत्तम पनपट, प्रतिभा जगताप, सुकन्या भोसले, मीनाताई गायके, हिमाताई पाटील, वैशालीताई, अंकिता विधाते,आशा दातार, संगीता जाधव, मिरा देशपांडे निर्मला मते, सुनिता गरुड, विद्या मोहिते, रेखा वाहटुळे, रंजना कोलते व प्रतिभा राजपूत आदी उपस्थित होते.