
दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा उपसंपादक- दीपक कटकोजवार
चंद्रपूर वेस्टर्न कोल फिल्ड लिमिटेड ने आर्थिक वर्षातील सी. एस. आर निधी चा गैरवापर करून ३० संगणक व दोन प्रिंटर हे चांदा पब्लिक स्कूल ला दिले आहे, ही एक खाजगी शाळा असून विद्यार्थीना शाळेत प्रवेश घेतानाच पालकांकडून डोनेशन घेऊन अवाजवी शुल्क आकारून फी घेतली जाते असे असताना देखील वेकोलि प्रशासनाने सी.एस.आर फंड चांदा पब्लिक स्कूल ला दिला जो चुकीचा व नियमबाह्य आहे. दरम्यान कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३५ च्या कोणत्या नियमानुसार सी. एस. आर फंड हा चांदा पब्लिक स्कूल ला दिला व त्यातून कोणती सामाजीक सेवा झाली असा सवाल करुन या बाबत त्वरित खुलासा करा अशा स्वरूपाची मागणी मनसेच्या विधी कक्ष विभागाच्या जिल्हाध्यक्षा अँड मंजू लेडांगे यांच्या नेतृत्वात झालेल्या वेकोलि मुख्य महाप्रबंधक कार्यालयासमोरील धरने आंदोलना दरम्यान ऍड.लेडांगे यांनी केली आहे. त्यांनी आपल्या भाषणातुन वेकोलि चा सीएसआर घोटाळा समोर आणला. याबाबत सविस्तर वृत्त असे की, सीएसआर फंड या शाळेला दिल्या मूळे गोरगरीब विद्यार्थ्यांवर अन्याय झालेला असून वेकोली ने हा निधी चांदा पब्लिक स्कूल ला देवून निधी चा गैरवापर केलेला आहे. सी. एस. आर निधी बेकायदेशीरित्या वापरला याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध असल्याचे जाहीर करुन सदर निधी कोणत्या शीर्षक/नियमाखाली देण्यात आला याचा खुलासा त्वरित करा अन्यथा तीव्र आंदोलन करू व न्यायालयात वेकोली विरुद्ध पी.आय.एल दाखल करू असा दमदार इशारा मनसेतर्फे देण्यात आला यावेळी मनसे विधी जिल्हाध्यक्षा एडवोकेट मंजु लेडांगे , मनसे राज्य उपाध्यक्ष दिलीप रामेडवार, मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, जिल्हा सचिव उमाशंकर तिवारी, महेश शास्त्रकार, सुनील गुडे, राजू कुकडे शहर अध्यक्ष विजय तुरक्याल, किशोर माडगुलवार, आनंद बावणे ,महेश वासलवार रमेश काळबांदे,पियुष धुपे राज वर्मा ,मनोज तांबेकर, गुरु मोगरे, कुलदीप चंदनखेडे, सागर गदई, अक्षय चौधरी ,तुषार येरमे, राकेश पराडकर ,सुयोग, वर्षा बोंबले कल्पना ,युगल ठेंगणे, शुभम वांढरे, राकेश बोरीकर , सुमित करपे व संपूर्ण मनसे सैनीक उपस्थित होते व या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे स्वराज्य रक्षक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मनोज पोतराजे व आशिष ताजणे यांनी या आंदोलनाला आधीच पाठिंबा दिला होता.