
दैनिक चालु वार्ता उपसंपादक अमरावती-श्रीकांत नाथे
अमरावती :-अखिल भारतीय बारी महासंघ व समाजाचे वतीने श्री संत गजानन महाराज नगरीमध्ये नुकतीच स्थानीय सर्किट हाऊस येथे नियोजन बैठक संपन्न झाली.
आगामी काळात अखिल भारतीय बारी समाजाची राजकीय,सामाजिक क्षेत्रात उन्नती व्हावी ह्या उदेशाने अखिल भारतीय बारी महासंघाचे अध्यक्ष रमेशजी घोलप यांचे प्रमुख उपस्थितीत व मान्यवरांचे उपस्थितीत शेगाव येथे नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती.ह्यामध्ये बारी समाजाचे दैवत संत श्री रुपलाल महाराज यांना राष्ट्रसंत दर्जा मिळावा व शासनदरबारी नोंद व्हावी तसेच अंजनगाव सुर्जी येथे श्री संत रुपलाल महाराज यांचे कर्मभूमीमध्ये राष्ट्रीय स्मारक व्हावे तसेच संपूर्ण भारतात वास्तव्यास असलेल्या समाजाला राजकीय,सामाजिक क्षेत्रात स्थान असावे तर बारी समाजाला भारतीय बारी समाज आर्थिक विकास महामंडळ शासनाने घोषित करून त्याची त्वरित अंमलबजावणी व्हावी व इतरही काही प्रमूख मागण्या संदर्भात सविस्तर अशी चर्चा करून आगामी १० सप्टेंबर २०२३ ला श्री संत शेगाव नगरीमध्ये खामगाव रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीचे २० एकराचे भव्य जागेत राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व प्रमुख मान्यवरांचे उपस्थित अखिल भारतीय बारी समाज राष्ट्रीय महा अधिवेशन संपन्न होणार आहे.ह्यामध्ये काही महत्वाचे ठराव सर्व सहमतीने संमत करून त्यावर योग्य अशी चर्चा करून व काही येणाऱ्या अडचणी,त्रुटी व आप,आपलें विचार मांडून कार्यक्रमाची दिशा ठरविण्यात आली.ह्यासाठी परिपूर्ण अशी नियोजन बैठक संपन्न झाली.सदरचे आयोजित महाअधिवेशनाला महाराष्ट्रासह,मध्यप्रदेश,गुजरात,उत्तरप्रदेश,दिल्ली,आंध्रप्रदेश,राजस्थान,बिहार,प्रयाग,गया,काशी, इ. अनेक राज्यांमधून समस्त बारी समाज यांना आमंत्रित करण्यात येणार असून,अश्या ह्या भव्यदिव्य कार्यक्रमाला सर्वांनी हातभार लावण्याचे आवाहन ह्यावेळी आयोजकांनी केले आहे.
ह्याप्रसंगी नियोजन बैठकीला बारी महासंघाचे अध्यक्ष रमेशजी घोलप,अनिलजी हिस्सल बुलढाणा,रतनजी फुसे औरंगाबाद,अर्जुनजी घोलप जळगाव जामोद,उमेशजी भोंडे एकलारा,देविदासजी येउल अकोला,मनोहर मुरकुटे अंजनगाव सुर्जी,भरतजी बारी,महादेव धर्मे,संजयजी नाठे,विलास तांडे,राजेश अस्वार,डॉ.श्याम नेमाडे अकोट,संजय मिसाळ,मंगरूलपीर,श्याम डांबरे,नंदकिशोर रेखाते,पांडुरंग ढगे,निलेश ढगे,डॉ.अक्षय घोलप,संजय ढगे,वैभव घोलप,रुपेश येउल,वृषभ सातपुते,राजेश येउल,मंगेश पाटील इ. असंख्य समाज बांधव ह्यावेळी नियोजन बैठकीला प्रामुख्याने उपस्थित होते