
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
वाघोली ता.16 आव्हाळवाडी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी प्रशांत रघुनाथ सातव यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर फटाक्याची आतिषबाजी व भंडार्याची मुक्तपणे उधळण करीत पारंपारिक वाद्याच्या गजरात प्रशांत सातव यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. बदामबाई आव्हाळे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंचपदाची निवड ग्रामपंचायत सभागृहात झाली. प्रशांत सातव यांचाच एकमेव अर्ज आल्याने त्यांच्या नावाची बिनविरोध निवडीची घोषणा ग्रामसेवक कोहिनकर यांनी केली. नवनिर्वाचित उपसरपंच सातव यांचा सभागृहात सत्कार करण्यात आला. प्रशांत सातव हे मा. सरपंच हेमंत सातव यांची बंधू आहेत. याप्रसंगी जि. प. सदस्य ज्ञानेश्वर कटके, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव गणेश कुटे, भाजपा युवा मोर्चा पुणे जिल्हा संघटक संदीप सातव, सरपंच नितीन घोलप, सुरेश सातव, मच्छिंद्र सातव, शरद आव्हाळे, चेअरमन प्रकाश सातव, रमेश सातव, हेमंत सातव, अविनाश कुटे, मंगेश सातव, तात्यासाहेब आव्हाळे, ग्रामसेवक अतुल कोहिनकर यांच्यासह आजी-माजी सरपंच, उपसरपंच व ग्रा. पं. सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. ग्रामस्थांना सुविधा पुरविण्याचा प्रयत्न आहे. कचरावर ड्रेनेजलाईन समस्या सोडवली जाईल. गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांना विश्वासात घेतले जाईल, असे प्रशांत सातव यांनी सांगितले.