
दैनिक चालु वार्ता चाकुर प्रतिनिधी – नवनाथ डिगोळे
प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणिला उजाळा ..
चाकुर ता.प्रः-चाकूर येथील लोकमान्य महाविद्यालयतील इयत्ता बारावीच्या वर्गातील १९९५ मधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन मेळावा आयोजीत करून साई नंदनवन येथे मन मोकळ्या गप्पात झाला. या स्नेह मिलन कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी लोकमान्य महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य शिवाजीराव नवरखले सर हे होते .तर प्रमुख पाहूणे म्हणून शिवनेरी महाविद्यालयाचे समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा . डॉ पांडूरंग मुठ्ठे हे होते . या वेळी व्यासपीठावर शेख, फुलारी मॅडम या होत्या . यावेळी प्रत्येक वर्ग मित्र मैत्रणीचे पुष्पगुच्छे देऊन स्वागत करण्यात आले . त्या नंतर प्रत्येकांनी आपल्या परिचया बरोबर वर्तमान स्थीतीचे कथन केले . त्यामुळे आनेकजन उच्च पदा बरोबरच वेग वेगळ्या क्षेत्रात चांगले काम करीत असल्याचे या मेळाव्यातून दिसून आले .
या मेळाव्यात अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मागील आठवणीला उजाळा देऊन आपल्या गुरु प्रती कृतज्ञता व्यक्त केली.प्रत्येक वर्ग मित्र व मैत्रनीने स्वतःचा परिचय कौटुंबिक आणि शैक्षणिक पाश्वभुमि,महाविद्यालयीन आठवणी,व्यवसायिक अनुभव व भविष्यातील वाटचाल याबाबत मनोगत,मनमोकळेपणे व्यक्त करून एकमेकांची मने जिंकली.२८ वर्षानंतर सर्वांना एकञ आनणाऱ्यां संयोजन समितीचे अभिनंदन करुन महाविद्याललीन जीवनात मिळविलेल्या संस्काराने वाढलात यश संपादन करत आहात.त्याच बरोबर हे संस्कार पुढच्या पिढीमध्येही प्रवाहित होत असल्याच अनुभव कथनातुन दिसुन येत असल्याच्या भावना व्यक्त झाल्या ,हा कार्यक्रम प्रत्येकास नवसंजीवनी जीवनऊर्जा देणारा ठरणार असल्याच सांगितले.सहभागी मिञांचा वाढदिवस व लग्नवाढदिवस या वेळी साजरा करण्यात आला.
शनिवारी सत्यसाई नंदनवन येथे लोकमान्य महाविद्यालयातील १९९५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता बारावी येथे शिकलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा स्नेह मित्र मिलन अर्थात गेट-टुगेदर कार्यक्रम मोठ्या थाटामाटात व उत्साहाच्या वातारणात साजरा करण्यात आला. यावेळी या विद्यार्थ्यांना अध्यापन करणारे तत्कालीन अनेक प्राध्यापक वृंद उपस्थित असल्याचे दिसून आले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. तसेच जे प्राध्यापक आणि विद्यार्थी हयात नाहीत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
प्रा.शिवाजी नवरखेले.प्रा.अ.ना.शिंदे सरांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनजय सुर्यवंशी यांनी आपल्या प्रास्ताविकातून स्नेह मित्र मिलन कार्यक्रमाची भूमिका विशद करून सर्व गुरुजनांना चरण स्पर्श करून नमन केले. सरस्वती पाटील यांनी सुत्रसंचलन तर आभार शौकत शेख यांनी मानले . या कार्यक्रमासाठी सलीमभाई तांबोळी,अंजली कुलकर्णी,रमाकांत फुलारी , भारती गिरके , विजय कांबळे,अनुराधा शेटे ,शेख नुरजहॉ ,शेख ताहेर ,विजया गजभार ,अनुपमा जोशी ( कुलकर्णी ) ,शेख राशदबी ,फैमुना पठाण,विजय दराडे ,धनराज सूर्यवंशी,किशोर मदनुरे, अॅड.उमाकांत घोगडे,औंदबर येडले , प्रा . डॉ .पांडुरंग मुठ्ठे ,शौकत शेख , प्रा .शालु हाके
,विलास वाघमारे, राजकुमार बेडके,गिरधर भेटे,कैलास गिरी,चंद्रकांत मोठेराव, अॅड शरद घुगे,बालाजी गायकवाड, बालाजी देशमाने , पांडूरंग शिंदाळकर , सुनिता शिडूळे सह जवळपास ५० विद्यार्थी उपस्थित होते.
चौकट :-
जीवन जगत असताना शिस्त असणे गरजेचे असते*
प्रा.शिवाजी नवरखेले
स्नेह मेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून प्रा.शिवाजी नवरखेले उपस्थित होते.यावेळी व्यासपीठावरुन मार्गदर्शन करताना माजी प्राचार्य प्रा.शिवाजी नवरखेले म्हणाले आजच्या धावपळीच्या युगात एकमेकांतील संवाद संपला आहे.आपआपल्या जिवन शैली व्यस्त आहेत.तुम्ही आम्हाला २८ वर्षानंतर आठवण करुन बोलावलात याचा मला अभिमान वाटतो.आम्ही शिकवलेल्या विद्यार्थ्यांनी आमचा सनमान केला यातच आमचे जिवन सार्थक झाले.शिक्षकांचा मान आणि सनमान झालाच पाहिजे असे ते म्हणाले माणसाच्या जिवनात शिस्त असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.जिद्द व चिकाटीमुळे विद्यार्थ्यांच्या जिवनात यश प्राप्त होत असतात.त्यांनी जुन्या आठवणीना उजाळा दिला.आम्ही शिकवले विद्यार्थ्यांचे पाल्या आज डॉक्टर,इंजिनियर,होत आहेत.विद्यार्थ्यांनी आप आपसात संवाद ठेवावा विचारांची देवाण घेवाण करावी.
चौकट : –
विद्यार्थ्यांच्या जिवनात शिक्षण महत्त्वाचे साधन आहे
प्रा.अ.ना.शिंदे
शिक्षणांमुळे माणसाच्या जीवनात काळानुरुप बदल होत असतात.आधुनिक काळातील शिक्षण प्रणाली बदलेली आहे.आज वॉटशॉप व फेसबुक युग आहे
स्नेह मेळाव्यात प्रा.अ.शिंदे यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.जुन्या आठवणीना त्यांनी उजाळा दिला.तब्बल २८ वर्षानंतर मला मी शिकवलेल्या विद्यार्थ्यांनी बोलावुन माझा मानसन्मान केल्या बदल मला समाधान वाटले .विद्यार्थ्यांच्या जिवनात अनेक चढउतार येत असतात.सुख दुःख याचा सामना करुन आपले जीवन जगावे लागते.जीवनात जगत असताना नियोजन महत्त्वाचे आहे.अर्थशास्ञीय भाषेत ते म्हणाले अमर्यादित गरजा व मर्यादित साधने यांचा मेळ साधने म्हणजेच अर्थशास्त्र आहे.विद्यार्थ्यांच्या चेहऱ्या कडे बघुन मला अभिमान वाटला की आजच्या युगात माणुसकी हरवत चाललेली आहे.आपण २८ वर्षानंतर आम्हाला आठवण करुन बोलवलात हिच आमच्या जीवनातील अनमोल शिधोरी आहे.