
दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
मराठवाडयातील शेतकऱ्यांकडे पेरणी करण्यासाठी आणि मुलींच्या लग्नासाठी पैसा नसतो.त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप पेरणीसाठी एकरी 10 आणि रब्बी पेरणीसाठी एकरी 10 हजार रुपये द्यायला हवे तरच शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी मदत होईल आणि शेतकरी आत्महत्या रोखता येईल.अशा प्रकारचा प्रस्ताव मराठवाडयाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर(sunil kendrekar) यांनी राज्य सरकारकडे पाठवला आहे.हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.शिवाय राज्य सरकारने तातडीने हा प्रस्ताव मंजूर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
गेल्या काही वर्षात मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे.प्रशासनाने शेतकरी आत्महत्या का करतात याची माहिती घेतली असता शेतकऱ्यांकडे खरीप आणि रब्बी हंगामात पेरणी करण्यासाठी पैसा नसतो.मुलींच्या लग्नासाठी देखील पैसा नसतो.यातून आलेल्या आर्थिक विवंचनेमुळे सावकार किंवा खाजगी बँकांच्या पाशात शेतकरी अडकला जातो. कर्जबाजारी पणामुळे नैराश्य येऊन शेतकरी शेतकरी मृत्यूला कवटाळतो.शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संख्येत अनेक उपाययोजना करूनही कमी येत नसल्याने विभागीय आयुक्तांनी राज्य सरकारकडे एक प्रस्ताव पाठवला आहे.शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरणीसाठी एकरी 10 आणि रब्बीच्या पेरणीसाठी एकरी 10 हजार रुपयांची मदत दरवर्षी करण्यात यावी जेणेकरून शेतकरी आत्महत्येचा विचार करणार नाही.असंही या प्रस्तावात म्हटले आहे.
राज्य सरकार आता या प्रस्तावावर काय निर्णय घेते याकडे आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं लक्ष लागले आहे.
मराठवाड्यात झालेल्या शेतकरी आत्महत्या
2019 मध्ये मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येचा आकडा 730 च्या आतच होता.2020 मध्ये 773, 2021 मध्ये 887 ,2022 मध्ये 1 हजार 23 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.तर 2023 च्या मार्च महिन्यापर्यंत मराठवाड्यात 214 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.यातील सर्वाधिक आत्महत्या या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केल्या आहे.जानेवारी 2023 ते मार्च 2023 पर्यत बीड जिल्ह्यात 65 शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली आहे।