
दैनिक चालु वार्ता गंगापूर प्रतिनिधी-अमोल आळंजकर
गंगापूर (प्रतिनिधी) येथील दुय्यम निबंधक कार्यालयात गेल्या दोन दिवसांपासून दुय्यम निबंधक नसल्याने दस्त नोंदणी रखडली असल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंडासह मानसिक त्रास होत आहे या ठिकाणी कायम स्वरुपी दुय्यम निबंधक देण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.
दुय्यम निबंधक कार्यालयातील दुय्यम निबंधक प्रविण मा. राठोड, श्रेणी-१ गंगापूर यांचेकडील दुय्यम निबंधक पदाचा पदभार १५ मे पासून काढून घेतला असून त्यांच्या जागेवर सह दुय्यम निबंधक वर्ग-२ छत्रपती संभाजीनगरचे शेख रसूल, वरिष्ठ लिपिक यांचकडे पुढील आदेशापर्यंत चार्ज सुपुर्द करण्यात आला होता परंतु वरिष्ठ कार्यालयाच्या निबंधक यांनी राहुल यानी चार्ज घेऊन दहा मिनिटे झाली असतील रसुल यांना मुख्यालयात बोलावून घेतल्याने येथील दस्त नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांना १५ मे रोजी संध्याकाळपर्यंत ताटकळत बसावे लागले तर १६ मे रोजी कार्यालयात दुय्यम निबंधक अनेक नागरिकांना आर्थिक भुर्दंडासह मानसिक छळवणूकीला समोर जावे लागले. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दुय्यम निबंधक श्रेणी -1 गंगापूर या कार्यालयाचा पदभार स्विकारण्यासाठी औरंगाबाद जिल्हयातील अधिकारी व कर्मचारी यांनी तक्रारीचे प्रचंड प्रमाण असल्यामुळे नकारात्मकता दर्शविली असल्याने मगळवार १६ मे रोजी दुय्यम निबंधक श्रेणी-1 कार्यालय गंगापूर हे कार्यालय दस्त नोंदणीसाठी अधिकारी नसल्याने बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकाची प्रचंड गैरसोय झालेली आहे.
तरी गंगापूर तालुक्यातील दस्त नोंदणी कार्यालयात कर्तव्यदक्ष व अनुभवी अधिकारी यांची नियुक्ती करण्यांत यावी. अशी मागणी नागरिका कडून करण्यांत येत आहे या ठिकाणी कायम स्वरुपी दुय्यम निबंधक देण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.