
दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा उपसंपादक- दीपक कटकोजवार
नेवजाबाई हितकारणी विदयालय नवेगाव (पां) च्या शालेय स्तरावरील माजी विद्यार्थी,विद्यार्थिनी व माजी शिक्षकांचा संयुक्त स्नेहमेळावा अतिशय दिमाखात राष्ट्रसंत विचार मंचावर २५० विद्यार्थी व त्यांच्या पालकांसोबत ५०च्या वर आजी माजी शिक्षकांच्या सहभागाने संपन्न झाला. मेळाव्याला अतिशय छान स्वरूप प्राप्त झाले होते.
कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी मंत्री व विद्यमान आमदार विजयभाऊ वडेट्टीवार,माजी मंत्री शोभाताई फडणविस, शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले, सरपंच ऍड.शर्मिला रामटेके व मेळाव्याचे संयोजक प्रा.महेश पानसे,आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव अशोक भैय्या हे होते. एन.सी.सी.पथकाच्या संचालनाने सर्व अतिथींना मंचावर सन्मानाने आणण्यात आले. दोन सत्रात संपन्न झालेल्या या मेळाव्याचे उदघाटन माजी मंत्रीद्वय श्री.विजयभाऊ वडेट्टीवार व श्रीमती शोभाताई फडणविस यांनी केले.
शाळेच्या स्वर्गवासी शिक्षक व विद्यार्थ्याला यावेळी सामुहिक श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर, विद्यार्थिनींच्या चमूने स्वागत गित सादर करून उपस्थितांचे शब्दसुमनांनी स्वागत केले.तसेच
आयोजन समिती तर्फे शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व आकर्षक स्मृतिचिन्ह देऊन आतिथी महोदयांचे मेळाव्यात सहभागी झालेल्या माजी विदयार्थी व विद्यार्थिनींच्या हस्ते स्वागत करण्यात आले. माजी विदयार्थी व मेळावा संयोजक महेश पानसे यांनी प्रास्ताविक करून आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. नवनियुक्त शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले यांचा शाळा,संस्था,ग्रामपंचायत व माजी विद्यार्थी यांचेतर्फे भव्य सत्कार करण्यात आला.व महेश पानसे संपादीत ”स्नेहछटा” या मेळावा स्मरणीकेचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रथम सत्रात मान्यवर अतिथींच्या हस्ते क्रिडा क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर नावारुपास आलेले माजी विद्यार्थी अनिल मांडवकर,उद्योग क्षेत्रातील नामवंत रविकिरण सहारे, कृषी क्षेत्रातून नवनाथ नवघडे यांना विद्यालया तर्फे गुणवंत पुरस्कार देण्यात आला तर सर्वश्री प्रा.महेश पानसे,डा.विठ्ठल बोरकुटे, गुरुदेव सेवा मंडळाचे सुबोध दादा यांना सेवाभावी व त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी सेवाव्रती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. १९६० पासून शिक्षकपदावर कार्यरत ४० वर शिक्षकवृंदांना मान्यवरांचे हस्ते विशेष उपहाराने सन्मानीत करण्यात आले. विशेष म्हणजे या मेळाव्यात गेली ४० ते ४५ वषं दुरावलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनीची झालेली मेळाव्याच्या निमित्ताने झालेली भेट अतिशय आनंदमयी व भावनिक होती. सारे विद्यार्थी गदगद झाले होते. आमदार सुधाकरराव अडबाले, आमदार विजय वडेट्टीवार व शोभाताई फडणविस यांनी अतिशय प्रभावी पणे संवाद साधून या शालेय स्तरावर संपन्न झालेल्या माजी विद्यार्थी मेळाव्याचे नियोजन,मांडणी व देखणेपणाचे कौतुक करीत बालपणातील आठवणींना उजाळा दिला.सरपंच शर्मिला रामटेके यांनी होतकरु विद्यार्थी घडविण्यात ने.हि.विद्यालयाचे योगदान विषद केले. आपल्या अध्यक्षीय भाषणातून संस्थेचे सचिव अशोकजी भैया यांनी
शाळेच्या उत्तरोत्तर प्रगतीत माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा सहभाग स्पष्ट करीत या नाविण्यपूर्ण मेळाव्याचे
भरभरून कौतुक केले. दुपारचे भोजनानंतर शाळेचे माजी शिक्षक व निवृत्त शिक्षणाधिकारी शिषीरबाबा घोनमोडे यांचे अध्यक्षतेखाली दुसरे सत्र पार पडले. यावेळी प्रमुख आतिथी म्हणून माजी विद्यार्थी तथा निवृत्त उपसंचालक आरोग्य विभाग डा.गणेश रामटेके,माजी विद्यार्थी तथा निवृत्त संचालक डा.शिवनकर, माजी विद्यार्थी प्राचार्य लेमराज लडके हे होते. या सत्रात संपुर्ण माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना स्मृतीचिन्ह, ग्रामगिता व स्मरणिकेचे वितरण करण्यात आले. संपुर्ण मेळावा दरम्यान नियोजन,शिस्त व व्यवस्था कोतुकास्पद होती.सकाळी नोंदणी,अल्पोपहार व दुपारचे जेवन अशी संपुर्ण व्यवस्था करण्यात आली.
सुंदर संचालन सतीष डांगी व शिक्षक कुथे यांनी पार पाडले. शाळा प्रभारी नरेंद्र चुऱ्हे व शिक्षकवृंद यांनी माजी विद्यार्थी मेळावा समितीला संपुर्ण सहकार्य केले. दोन्ही सत्रात अनेक माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपले मनोगत मांडले.