
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
नांदेड/लोहा:-लोहा तालुक्यातील पिंपळदरी येथे कंधार-लोहा तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री. श्यामसुंदर शिंदे साहेब यांनी जाधव पाटील व शिंदे पाटील यांच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहून वधूवरांना शुभ आशिर्वाद दिले. या यावेळी त्यांचा दोन्ही परीवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला याप्रसंगी उपस्थित शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष श्री. बालाजी इसादकर, पिंपळदरी चे सरपंच श्री. संतोष पाटील जाधव, गोळेगांवचे सरपंच श्री. कैलास पाटील, श्री. रणजित पाटील शिंदे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.