
दैनिक चालु वार्ता कारंजा प्रतिनिधी -महादेव तायडे
सामाजिक ऋण फेडायचे असेल तर हातात हात घालून कार्य करा त्यामुळे समाजातील शेवटच्या माणसाला न्याय देता येतो त्याला सक्षम बनविणे हेच काम खरे ईश्वरीय काम आहे त्यातच पुण्य मिळते अल्लाहचे आदर्श दुत होता येते त्यामुळे पायात पाय न घालता हातात हात घालून काम करा अल्लाह आपल्याला बरकत देईल असे उदगार राष्ट्र वादी नेते मो.युसुफ पुंजानी यांनी
शहरातील मेमन युथ विंग कारंजा तर्फे ईद मिलन सोहळा कार्य क्रमात अध्यक्षीय भाषणात काढले. मेमन जमात खाना येथे दिनांक 14/05/23ला संपन्न झाला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहम्मद युसुफ सेठ पुंजाणी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून हाजी आरीफ भाई भोगाणी,फारुख भाई पोपटे, करीम सेठ ममदाणी,हाजी गफार सेठ अंसारी,युसुफ सेठ ममदाणी,शफीसेठ घाणीवाला शफी सेठ पुंजाणी, इम्तियाज मालाणी ,जावेद आकबानी मंचकावर उपस्थितीत होते.
प्रास्ताविक अनिस अंसारी यानी केले मेमन युथ विगचे कारंजा अध्यक्ष इमरान पारेख यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले आहे की समाजात आपल्या पेक्षा मोठ्यांचे आदर केल्याने आयुष्यात यश प्राप्त होणार. यापुढेही आपल्या पेक्षा मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन वेग वेगळे सामाजिक कार्य सुरू राहील लवकरच मेमन युथ विंग तर्फे एबुंलस काही दिवसांत आपल्या सेवेत येणार असल्याचे सांगितले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेमन युथ विंगचे इमरान पारेख,अब्बु अंसारी,मुसा आकबानी,सोहेब,मरछिया,वसिम रुलानी,अशरफ पंजु,बबलु विंधानी,आसिफ भोगानी व मेमन युथ विंग चे सदस्य यामीन मामदानी , जुनेद अन्सारी, आरीफ अन्सारी , फिरोज नगरीया, सलमान नगरीया, रोहन शेखा, असफाक रुलानी , अलतम पुजांनी बिलाल मालाणी, इरशाद लुलानिया, उस्मान हासमानी फारुख हासमानो, इरफान आकबानी, जिक्कर अन्सारी , आसीम पारेख, मुज्जमील आकबानी, सलीम पुंजांनी , अमीन आकबानी, सोहेल मामदानी , उवेश पारेख, राहील घानीवाला व अनेक सदस्यानी अथक परिश्रम घेतले, संचालन यासीर अंसारी यांनी तर आभार प्रदर्शन अबु बक्कर अन्सारी यांनी मानले, कार्यक्रमात अलताफ पुंजाणी, पत्रकार प्रा सी पी शेकुवाले पत्रकार हमीद शेख पत्रकार आरिफ पोपटे, पत्रकार फीरोज शेकुवाले, पत्रकार सैय्यद आसिफ पत्रकार मोहम्मद मुनिवाले पत्रकार एम डी मुलीवाले यांच्या सह शहरातील मेमन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.