
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -महादेव तायडे
कारंजा – वाढत्या तपमानच्या तिव्रतेमुळे वाशिम जिल्ह्यात जन जीवन विस्कळीत होऊन सर्वसामान्य मानसाला इजा होण्याची शक्यता लक्षात घेता येत्या काळा मध्ये जिल्ह्यातील तापमानाचे प्रमाण हे 44 अंश डिग्री सेल्सियस पेक्षा जास्त पोहोचले तर ते वाढत्या तापमान अंकाचे निर्देशक असु शकते; ही शक्यता लक्षात घेता वाशिम जिल्ह्यातील शासकीय कार्यालये, दुकाने, बॅंका ह्या सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत बदं ठेवाव्यात व कार्यालयीन वेळांमध्ये बदल करावा हे लक्षात घेऊन त्यांच्या कामाच्या वेळांमध्ये बदल करण्यात यावा तसेच गरजे नुसार सदर प्रतिष्ठांच्या बाहेर तापमानापासुन बचाव होईल असे शेड, शामीयाने टाकुन उष्माघातापासुन पुर्व उपाययोजना कराव्यात. सोबतच उन्हाच्या तिव्रतेपासुन वाचण्यासाठी निराधार, बेघर, वुद्ध घरहीन लोकांसाठी निवारा उपलब्ध करुन देण्यात यावा असे आवाहन सर्वधर्म मित्र मंडळच्या सास कंट्रोल रुम द्वारे शाम सवाई यांनी दिनांक 13 मे 2023 रोजी जिल्हाधीकारी वाशिम यांना इमेल द्वारे केली आहे.