
दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी -राठोड रमेश पंडित
==========================
लातूर/रेणापूर:- शेतीच्या बांधावरून झालेल्या भांडणात शेजारील शेतकरी व त्याचा मुलाने शेत शेजाऱ्याच्या जावयाचा केला चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची खळबळ जनक घटना दि:- १९/०५/२०२३ रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास रेणापूर तालुक्यातील समशापूर शिवारात घडली आहे. या प्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आले असून तिघांना अटक करण्याची माहिती दि-१९/०५/२०२३ रोजी संध्याकाळी रेणापूर पोलिसांनी दिली आहे .रेणापूर तालुक्यातील समशापूर येथील बळीराम खोडवे व भारत फुलसे यांचा शेतीसाठी पूर्वीपासून वाद चालू होता. दि- १९/०५/२०२३ रोजी सकाळी शेतामध्ये दोन्हीकडील महिला काम करत असताना त्या महिलांमध्ये बांधावरून भांडण सुरू झाले भांडण सोडवण्यासाठी गेलेले शेत मालक बळीराम खोडवे यांचे जावई सतीश जमादार वय वर्षे (४५) यास तेथे हजर असलेल्या शेतकऱ्याचा मुलगा शाम फुलसे यांनी व त्यांचे वडील भारत फुलसे यांनी शिवीगाळ केली तसेच भारत फुलसे यांनी त्याच्याकडे असलेल्या चाकूने सतीश जमादार यांच्या पोटावर व पाठीवर सपासप वार करून जखमी केल्याची माहिती समोर आली आहे.सतीश जमादार जमादार जखमी झाल्यानंतर या घटनेची माहिती गावातील गावातील मंडळी यांना कळाल्यानंतर गावातील मंडळी सतीश जमादार यास उपचारासाठी रेणापूर येथील शासकीय रुग्णालयात नेले आसता रेणापूर येथे उपचार झाला नसून लातूर जिल्हास्थरिय शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना सतीश जमादार यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच चाकूर व रेणापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी निकेतन कदम सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली असून या प्रकरणी महादेव खोडके यांनी दिलेल्या फिर्यादी वरून तिघांनविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आले आहे. या प्रकरणी अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी निकेतन कदम हे करीत आहे .