
दैनिक चालु वार्ता ग्रामीण प्रतिनिधी -माणिक सुर्यवंशी.
अखिल भारतीय वैद्यकीय महाविद्यालयीन बुद्धिबळ चॅम्पियनशिप च्या विद्यमाने खेळविण्यात आलेल्या भारतातील संपूर्ण वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची अत्यंत मानाची बुद्धिबळ स्पर्धा नुकतीच बिहार येथील पाटणा येथे खेळवण्यात आली होती.
त्यात मुंबई येथिल सर जे.जे.हॉस्पिटल चा विद्यार्थ्यी, युवा बुद्धिबळपटू ओमकार बालाजीराव पेटेकर यांनी या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व करत देशातील विविध राज्यांतील स्पर्धकांबरोबर निकराची झुंज देत या चुरशीच्या स्पर्धेमध्ये ओमकार बालाजीराव पेटेकरला सुवर्ण पदक हुकले तरी ब्राँझ पदकासह तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.ग्रामीण साहित्यिक,कवी बालाजी पेटेकर खतगावकर यांचा तो मुलगा आहे.यापूर्वीही ओमकार पेटेकर यांनी तालुकास्तरीय,जिल्हास्तरीय,विभागीय व राज्य स्पर्धेत प्रथम क्रमांकाने बाजी मारली होती.त्याच्या या अखिल भारतीय बुद्धिबळ स्पर्धेतील घवघवीत यशाबद्दल परिसरातील मित्रपरिवार, हितचिंतकांनी शुभेच्छा देयुन अभिनंदन केले…