
दैनिक चालू वार्ता बल्लारपूर प्रतिनिधी -कमलेश नेवारे
जनसेवा हिच ईश्वर सेवा मानणारे,आमचे मार्गदर्शक, आमचे गुरुवर्य मा. सुधीर भाऊ मुनगंटीवार जी वने, मत्स्य व्यवसाय तथा सांस्कृतिक कार्यें मंत्री महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री गोंदिया व चंद्रपूर जिल्हा यांची समाजसेवेची प्रेरणा घेऊन उभारलेली समाजसेवी संस्था सुधीर भाऊ जनसेवा बहुउद्देशीय संस्था बल्लारपूर रजि.नं. चंद्रपूर 0000113/2022 ( श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर )तर्फे स्वर्गीय डॉ. सच्चीदानंद मुनगंटीवार जी यांच्या स्मृती पित्यर्थ बल्लारपूर शहरातील होतकरू व हुशार मुलींकरिता इंग्रजी स्पिकिंग क्लासेस आयोजित करण्यात येत असून, तसेंच भविष्यासाठी योग्य मार्गदर्शन करण्यात येणार आहे.या मध्ये बल्लारपूर मधील प्रसिद्ध शिक्षक श्री अरविंद इमूलवार सर जी, प्रसिद्ध प्राध्यापक व वरिष्ठ पत्रकार श्रीनिवास उनिवा सर जी, बल्लारपूर शहराचे वरिष्ठ पत्रकार श्रीनिवास कंदकुरी जी,तसेंच बल्लारपूर शहरातील प्रसिद्ध शिक्षक व मार्गदर्शक श्री. आदिल सर जी मुलांना मार्गदर्शन करणार आहेत.या क्लासेस से आयोजक हें सुधीर भाऊ जनसेवा बहुउद्देशीय संस्था बल्लारपूर रजि.नं. चंद्रपूर 0000113/2022 ( श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर) चे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर जी, सचिव शशिकांत मुंडे जी,सुधाकर सिक्का जी, श्रीनिवास पिसार जी, नारायण सुका जी,कमल वर्मा जी, रुपेश भैया जी, जी प्रामुख्याने उपस्थित होते.