
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
मंठा तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातुन अवैध वाळू उत्खनन करून वाहतुक करणारा टेम्पो व ट्रॅक्टर परतूर उपविभागीय अधिकाऱ्यांनी व मंठा महसूलच्या पथकांनी मंगळवारी पकडले . दोन्ही वाहने पोलीसांच्या ताब्यात दिले.
मंठा तालुक्यातील पुर्णा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात राजरोसपणे अवैध वाळू उत्खनन व वाहतूक सुरू आहे. विषेश म्हणजे , अवैध वाळू वाहतूकीकडे मंठा पोलीसांनी ‘अर्थपुर्ण’ दुर्लक्ष केल्याचा तक्रारी वाढल्या आहेत. देवठाणा , उस्वद , लिबंखेडा , सासखेडा, टाकळखोपा , किर्ला ,भुवन व वझर सरकटे येथील वाळू माफियांकडुन पावसाळ्याच्या तोंडावर अवैध वाळूसाठे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र , परतुर उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव व मंठा तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी कारवाईचे सत्र सुरू केले. मंगळवारी रात्री सासखेडा शाळेजवळ अवैध वाळू वाहतूक करतांना टेम्पो क्र. एम एच २१ बीएच २२६३ याला मंठा महसूलच्या पथकातील मंडळ अधिकारी डी बी बेले , तलाठी नितीन चिंचोले व डी आर गाढवे यांनी पकडले. तर वझर सरकटे येथून अवैध वाळू वाहतूक करतांना बीना नंबर ट्रॅक्टर परतुर उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव व श्रीष्टी मंडळ अधिकारी एस आर वरकळकर यांनी पकडले. या आठवड्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्या तब्बल ७ वाहनांवर महसूलने कारवाई केल्यामुळे वाळू माफियांत भिंतीचे वातावरण निर्माण झाले.
आरटीओचे दुर्लक्ष ?
मंठा तालुक्यातील पूर्णा नदी काढच्या देवठाणा , उस्वद , कानडी , हनवतखेडा, लिंबखेडा , सासखेडा , दुधा, इंचा , किर्ला , पोखरी केंधळे, भुवन व वझर सरकटे येथील ट्रॅक्टर , टेम्पो , टिप्पर व हायवा या वाळू वाहतूकीचा वाहनांवर नंबर दिसून येत नाही . कारवाई दरम्यान महसूल पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो. या गंभीर प्रकाराकडे जालना आरटीओचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष दिसून येत आहे.