
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
मंठा जालना जिल्ह्यातील अनेक पाझर तलावातून जिल्हा जलसंधारण कार्यकारी अभियंता श्री.झोरावत यांनी कोट्यावधी रुपयाचा मरूम विकला म्हणून मनसेच्या वतीने दि.२४ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन परतुर तालुक्यातील माव शिवारातील गट क्रमांक १०३/१०४ या परिसरातील पाझर तलावातून कार्यकारी अभियंता श्री झोरावत कोणताही अर्ज नसताना सई कंट्रक्शन कंपनीला शासकीय मालमत्ता कोट्यावधी रुपयाचा मुरूम विकला म्हणून तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून पुढील कारवाई करण्यात यावी, कारण जिल्ह्यातील अनेक पाझर तलावातून कोणताही अर्ज संबंधित एजन्सीला केलेला नाही परंतु कार्यकारी अभियंता यांनी खाजगी परवानगी देऊन कोट्यावधी रुपयाचा मरून विक्री केला, खरंतर जलसंधारण (लोकल सेक्टर) पाझर तलाव म्हणजे या डिपारमेंटची प्रॉपर्टी आहे, याचा फायदा घेत कार्यकारी अभियंता श्री झोरावत यांनी मुरूम विक्री करून कोट्यावधी रुपये कमावले, परतुर तालुक्यातील. माव (पाटोदा) शिवारातून गट क्रमांक १०३/१०४ या परिसरातील पाझर तलावातून शेकडो ब्रास मुरूम सई कंट्रक्शन कंपनी जालना या कंपनीच्या मालकाने जलसंधारण कार्यकारी अभियंता यांच्याकडून खाजगी मुरूम विकत घेतला कारण सई कंट्रक्शन या कंपनीने अर्ज सुद्धा केलेला नाही, म्हणून यांना कोणत्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही, याचा अर्थ कार्यकारी अभियंता यांच्याकडून खाजगी मरून विकत घेतला, म्हणून संबंधित एजन्सीच्या मालकाने या पाझर तलावातून शेवगा ते अंतरवाली फाटा या रस्त्याच्या पूर्ण कामावर हा मुरूम वापरला, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५८४ माव ते पाटोदा येणारा या रस्त्याच्या कामासाठी पूर्ण मुरूम याच पाझर तलावातून वापरला, माव येनोरा पाटोदा, तसेच शेवगा ते अंतरवाली फाटा, हे दोन रस्ते प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेअंतर्गत करण्यात आले, येनोरा कुंभारी पिंपळगाव २२३ रामा,ते दैठणा फाटा,माव,पांडे पोखरी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय क्रमांक २ जालना या कार्यालय अंतर्गत होत आहे,या रस्त्याच्या कामावर या पाझर तलावातून चोरी करून मुरूम वापरला, शासकीय मालमत्तेची चोरी केल्याप्रकरणी जिल्हा जलसंधारण (लोकल सेक्टर) कार्यकारी अभियंता जालना व सई कंट्रक्शन फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजेत, कारण ही मंडळी पैसे कमवायचा हेतू डोळ्यासमोर ठेवून बेकायदेशीर कामे करतात यांना धडा शिकवण्यासाठी कठोर कारवाई होणे गरजेची आहे,करण सई कन्ट्रक्शन कंपनीचे मालक सागर बरदापूरकर यांनी परतुर घनसावंगी तालुक्यातील त्यांना मिळालेल्या कामावर याच पाझर तलावातून जिल्हा जलसंधारण कार्यकारी अभियंता यांच्याकडून मुरूम विकत घेऊन कामावरती वापरला, खास बाब म्हणजे या पाझर तलावातून ज्या ठिकाणाहून मुरुम उत्खनन केला तो पाझर तलावाच्या अगदी भिंतीला खेटून मुरूम खोदकाम केल्यामुळे खालच्या भागात पोकळी निर्माण झाली हा पाझर तलाव केव्हाही फुटून त्या भागातील शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते? म्हणून असे जर झाले तर त्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई कोण देणार संबंधित कॉन्ट्रॅक्टर का कार्यकारी अभियंता, हा खूप गंभीर प्रश्न आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रत्यक्षात पाझर तलावाची पाहणी महसूल विभागामार्फत करण्यात यावी कारण या पाझर तलावातून शेकडो ब्रास मुरूम खोदकाम करून संबंधित गुत्तेदार सागर बरदापूरकर, यांनी कार्यकारी अभियंता जलसंधारण विभाग जालना यांच्याकडून विकास घेतला, म्हणून यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अपेक्षा आहे. कारण दि,२१ मे २०२३ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पाझर तलावाची पाहणी केली असता पाझर तलावाचे नुकसान करून या पाझर तलवातून जिल्हा जलसंधारण कार्यकारी अभियंता श्री झोरावत यांनी मुरूम विकल्यानंतर त्यानंतर दिवसाढवळ्या सई कंट्रक्शन जालना या कंपनीचे तीन ट्रक एक जेसीबी एकूण चार वाहने त्या पाझर तलावातून मुरूम खोदकाम करून चोरी करीत असताना पळून गेले, कारण त्या पाझर तलावाकडे कोणी तरी येत आहे म्हणून त्या परिसरात लोकेशन घेऊन मुरमाची सतर्क राहून चोरी केल्या जाते, हे सगळे वाहने सई कंट्रक्शन कंपनीचे मालक सागर बरदापूरकर यांनी कामावरती लावलेली आहेत, किंवा त्यांच्या मालकीचे सुद्धा असतील पाझर तलावातील खोदकाम करून मुरूम कायदेशीर कार्यकारी अभियंता यांच्याकडून मुरुम विकत घेतला, त्याचे जिओ टॅग फोटो पुरावा म्हणून या पत्रासोबत आपणास देत आहोत. शेवटी असेही पत्रात नमूद केलेले आहे.