दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा उपसंपादक- दीपक कटकोजवार
स्थानिक सरदार पटेल महाविद्यालयात मार्च एप्रिल 2023 या कालावधीत घेतल्या गेलेल्या एच एस सी बोर्ड परीक्षेत यावर्षी देखील विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम करून घवघवीत यश संपादित केले आहे.
कला, वाणिज्य, विज्ञान व एच एस सी व्होकेशनल (एमसीव्हीसी) या विभागात एकूण 693 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यामध्ये कला शाखेचा निकाल 72.67 टक्के , वाणिज्य शाखा 87.21टक्के, विज्ञान शाखा 96.80टक्के, तर एच एस सी व्होकेशनल(एमसीव्हीसी )87.50टक्के लागला.
यावर्षी विज्ञान शाखेतून प्रथम कु.मंजिरी प्रशांत चौधरी 86% , द्वितीय क्रमांक पंकज रामसरे बावरे यांनी पटकावला,तृतीय कुमारी शिवानी प्रशांत नंदनवार 79.67 टक्के,कला शाखेतून प्रथम कु.गौरी वामन निकोडे 82.50 टक्के , द्वितीय . सेजल गजानन वरभे 81 टक्के , तृतीय मोहित सहदेव निकोडे 75.83 टक्के ,वाणिज्य शाखेतून प्रथम कु.सानिका सुदेश झुलकंटीवार द्वितीय मानसी रुपेश कुमार सोनी 94.67 टक्के ,तृतीय संस्कृती महेंद्र पाल91.50 टक्के मिळवला त्याचप्रमाणे एचएससी व्होकेशनल (एमसीव्हीसी) मधून प्रथम जितेंद्र यादव 63.50 टक्के द्वितीय पंकजा महेंद्र कपूर 63.17 टक्के मिळविले.
या निकालाबद्दल सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्रीमती सुधाताई पोटदुखे, कार्याध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सचिव प्रशांतभाऊ पोटदुखे, सहसचिव माजी कुलगुरू डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित, सदस्य सगुनाताई तलांडी, श्री राकेश पटेल,श्री एस. के. रमजान, मनोहर राव तारकुंडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर, उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक सी. जे. खैरवार तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असल्याची माहिती विद्यालयाच्या खास सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.


