
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी – प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
.नांदेड – कंधार तालुक्यातील दिग्रस बु या गावी महाराष्ट्राचे आराध्य दैवत , कुळवाडी भुषण , बहुजन प्रतिपालक ,सिंहासनाधिश्वर , स्वराज्य संस्थापक , रयतेचे कल्याणकारी राजे श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वारूढ स्मारक राष्ट्रीय महामार्गावर पूर्वनियोजित जागेवर अतिशय भव्य दिव्य स्वरूपात दिमाखदार पद्धतीने उभारण्यात आले असून या भव्य दिव्य स्मारकाचे भूमिपूजन 2019 मध्ये करण्यात आले होते आणि दोन ते तीन वर्षाच्या कालावधीमध्ये अतिशय भव्य दिव्य असे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वारूढ स्मारकाचे काम दिग्रस चे माजी ग्रामपंचायत सदस्य मारोती भाऊ भगवानराव पाटील गवळे यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रातील मावळ्याच्या ऑनलाइन देणगी च्या माध्यमातून स्मारक उभारणीचे कार्य दि.14 जुन 2021 मध्ये पूर्णत्वास गेले आहे. .दिग्रस बु.या गावी इ.स.1975 साली गावातील ज्येष्ठ नागरिक तथा माजी सरपंच माननीय आप्पाराव पाटील शिंदे यांच्या नेतृत्वात ” छत्रपती शिवाजी महाराज यांचे अर्धाकृती स्मारक ” स्मृतीशेष गोविंद तुळशीराम कांबळे (बौध्द ) , स्मृतीशेष पोचिराम जळबा कांबळे ( बौद्ध ) ,कै.माधवराव पंचगल्ले ( कोष्टी ) , माधवसिंह ठाकूर ( राजपूत ) व इतर सहकाऱ्यांच्या हस्ते बसवण्यात आले होते तसेच याच गावात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य दिव्य स्मारक इ.सन 2004 साली उभारण्यात आले असुन त्या अनुषंगाने इ.सन. 2017 च्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळ्यात प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव यांनी आपल्या भाषणात दिग्रस नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य दिव्य अश्वरुढ स्मारक असावे अशी भावना व्यक्त केली होती याप्रसंगी दिवस नगरीचे तंटामुक्ती अध्यक्ष पंडित शंकरराव भुरे तसेच माजी उपसरपंच विश्वंभर जयवंतराव पाटील यांची उपस्थिती होती.. . त्या अनुषंगाने माजी ग्रामपंचायत सदस्य मारोती भाऊ भगवानराव पाटील गवळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वारूढ स्मारक दिग्रस नगरीमध्ये थाटामाटात उभे केले पाहिजे या विचारधारेतून संपूर्ण महाराष्ट्रातील मावळ्यांना ऑनलाइन पद्धतीने निधी देण्याचे आव्हान करून रयतेचे कल्याणकारी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य दिव्य अश्वरुड स्मारक पूर्वनियोजित जागेवर अगदी दिमाखदार पद्धतीने पूर्णत्वास नेले आहे. .14 जून 2021 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्र्वरुढ स्मारक पूर्ण झाले असून तीन वर्षापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत ते आजही वाट पाहत आहे महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमी जनता मारोती भाऊ गवळे यांना अर्त हाक देत असून महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यांचे , स्मारकांचे लोकार्पण छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्या दिनी करण्यात यावे अशा प्रकारची मागणी परिसरातील जनतेतून मोठ्या प्रमाणात होत आहे जर राज्याभिषेक सोहळ्या पर्यंत महाराजांच्या लोकार्पणांचा कार्यक्रम झाला नाही तर प्रशासनाची परवानगी घेऊन कोणत्याही दिवशी सर्व गावातील मावळ्यांना बोलावून घेऊन प्रशासकीय अधिकाऱ्याच्या हातून उद्घाटन सोहळा संपन्न केला जाईल अशा प्रकारची चर्चा जनतेतून ऐकावयास मिळत आहे. .याही पलीकडे दिग्रस व दिग्रस परिसरातील तमाम जनता अर्थातच शिवप्रेमी मावळे माजी ग्रामपंचायत सदस्य मारोती भाऊ भगवानराव पाटील गवळे यांना विनंती करत आहेत की आपण लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे उद्घाटन करण्यासाठी प्रयत्न करावेत कारण हे भव्य दिव्य स्मारक उभे करून जवळपास तीन वर्षे पूर्ण झाली आहेत आणि कुठल्याही महापुरुषाच्या स्मारकाचे तीन तीन वर्ष उद्घाटन न होणे ही बाब अशोभनीय आहे याची आपण गांभीर्यपूर्वक दखल घ्यावी व लवकरात लवकर उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करावा कारण हे स्मारक केवळ आपल्या नेतृत्वात झाले आहे.आपण यासाठी पूर्णपणे तयारी करावी अशी मागणी तमाम जनतेतून होत आहे.