
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी उमापूर-
गेवराई/ उमापूर मधील जिल्हा परिषद शाळा हे घाणीचे साम्राज्य बनले आहे.या शाळेच्या भोवती व शाळेत फॉग सारखे सेंट दरवळत आहे, कारण या शाळेच्या भोवती घाणीचे साम्राज्यच एवढे वाढले आहे, की येथून जाताना माणसाला उलटी येते एवढी मोठी शाळेच्या भोवती दुर्गंधी पसरली असताना याकडे कोणाचेही लक्ष नाही.येथे शाळेच्या भिंती लगत फक्त घाणच दिसून येते, याची दुर्गंधी शाळेच्या पूर्ण परिसरात घुमते, शाळेच्या पूर्ण परिसरात समोर मागे पूर्ण अस्वच्छताघेतात याचे कारण फक्त घाणच असू शकते आहे? येथे कोंबडीचे पक, हे कापसाच्या जिनिंग मध्ये जसा कापूस साठवल्या जातो, त्याच प्रकारे ह्या घाणीचे दृश्य दिसते.या घाणीची दुर्गंधी एवढी भयानक आहे की पावसाळ्यात शाळेच्या आत बसायला देखील लाज वाटते, शाळेच्या एकदम समोर दारूचे दुकान व घाण पूर्ण घाण पसरलेली आहे.तेथे श्वास घेणे ही कठीण जाते, या परिस्थितीत मुले तिथे शिक्षणासाठी जातात.व ही अस्वच्छता सहन करतात.याची दखल पालक का घेत नाही?
ग्रामपंचायत का घेत नाही?
शाळेला खर्च झालेला शासनाचा पैसा फक्त कागदोपत्रीच राहतो का?
ग्रामपंचायत चे याकडे दुर्लक्ष का होत आहे.
याची जिल्हा परिषद ने विचारणा केली पाहिजे!
या घाणीमुळे आधीच या शाळेत मुले शिकायला येत नाहीत.व तेथीलच दुसऱ्या शाळेत ऍडमिशन घेतात.
उमापूर या गावाच्या नागरिकांतून ही खंत व्यक्त होते.याच शाळेतून काही डॉक्टर,वकील, इंजिनियर,व विविधचांगल्या पदावर गेलेले विद्यार्थी आहे आदर्श शाळेची अशी अवस्था संबंधित अधिकाऱ्यांनी केलि आहे.आता याकडे कोणाचे लक्ष लागेल का?या शाळेच्या दुरावस्थेला कोण कारणीभूत आहे.
या घाणीला जबाबदार कोण?उमापूर नागरिकांतून या घाणीच्या साम्राज्यामुळे उमापूर नागरिकांतउमापूर नागरिकांतून संतप्त व्यक्त केला जातो.