
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी-अनिल पाटणकर
पुणे : प्राचीन काळापासून आपल्या कलेच्या माध्यमातून समाजात वेगळा ठसा उमटवनारा तसेच राजे महाराजांच्या काळात विशेष राजाश्रय असलेल्या सोनार समाज्याची सध्या चालू असलेली वाताहत आणि सामाजिक, राजकीय आणि आर्थिक कोंडी सोडविण्यासाठी समाज्याच्या विविध पोटशाखांच्या भिंती तोडून सर्व समाज एकसंघ करण्यासाठी पुण्यातील खडके फौंडेशनच्या सहकार्याने शनिवारी (दि.२७) मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, पुणे येथे सोनार हितकारणी सभेचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्रातील एकुण समाजरचनेपैकी मुळात अत्यल्प असलेल्या सोनार समाज्याच्या राज्यातील विविध प्रांतात मिळून जवळपास अठरा पोटजाती आहेत त्यांना एका छताखाली आणणे हा या सभेचा मुळ उद्देश होता. बौद्धिक व व्यावसायिक क्षमता असतानाही सामाजिकदृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या मागासलेला समाज म्हणून या समाजाकडे बघण्याचा दृष्टीकोन निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे त्याला छेद देऊन पुन्हा नव्याने समाज उभारणी करण्याचे ध्येय उराशी बाळगून समाज माध्यमातून तसेच विविध पोटजातीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाज्याची विभागवार, जिल्हावार तसेच तालुकावार रचना करून समाज्यातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच शासन दरबारी समाज्याच्या व्यथा मांडून त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे ठरविण्यात आले. सोनार समाज्याच्या इतिहासातील अशी पहिलीच सभा झाली असून संपूर्ण राज्यभरात अशा सभांच्या माध्यमातून समाज परिवर्तन करण्याचे व यापुढील सभा जुन महिन्यात छत्रपती संभाजीनगर येथे होणार असल्याचे निश्चित करण्यात आले.
महाराष्ट्रातील सोनार समाज्यातील प्रत्येक व्यक्ती आणि कुटुंबाची आजची राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक सद्यस्थिती आणि भविष्य काळातील प्रगती व उन्नतीबाबत विचारमंथन व्हावे यासाठी प्रा.अभिजीत पंडित व डॉ.शिवाजी विसपुते यांनी पुढाकार घेत या सभेचे आयोजन केले होते यावेळी माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर, शिवानंद टांकसाळे (निवृत्त भा.प्र.से.),जेष्ठ ग्रामीण साहित्यिक ब.ल.पोतदार, माजी सनदी अधिकारी संजीव खडके, यांचेसह विविध क्षेत्रातील मान्यवर व संपुर्ण राज्यातील सोनार बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.