
दैनिक चालु वार्ता लोहा/प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा लोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लोहा शाखेच्या वतीने वतीने लोहा शहरांच्या पंरपंरेनुसार खारिक खोबऱ्याचा हार घालून भव्य सत्कार करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्वपूर्ण नेते म्हणून ओळखले जाणारे राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे लोहा तालुकाध्यक्ष रमेश माळी यांच्या शिष्टमंडळाने परळी येथे त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांचा लोहा शहरांच्या पंरपंरेनुसार खारिक खोबऱ्याचा हार घालून भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे लोहा तालुकाध्यक्ष रमेश माळी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवराज पाटील पवार, मनोहर पाटील पवार, गोविंद रामन यादव आदी उपस्थित होते.