
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड – गोविंद पवार
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारीचे दिनांक 11 जुनला आळदीत प्रस्थान होणार असून त्यात अनेक दिंडीचे वारकरी आपली दिंडी पताका टाळकरी भाविक भक्त लाखोंच्या संख्येत सामील होतात त्या मध्ये श्रीगुरु भजन शिरोमणी वारकरी भुषण प्रेमराज महाराज आनंदवाडीकर यांची दिंडी ७ जुनला आनंदवाडी घोडज येथून आपले भाविक भक्त वारकरी टाळकरी घेऊन सहभागी होणार आहे तरी आपणही या सोहळ्यात सहभागी होऊन मानवी जीवनाचे सार्थक करण्यासाठी व आत्मनंदासाठी सहभागी होण्याचे आवाहन दिंडी प्रमुख श्री गोपिनाथ केंद्रे महाराज ज्ञानोबा माऊली घुगे पि बी गोरपल्ले साहेब नारायण पाटील चोडे विश्वनाथ पाटील इंगळे बजरंग कऱ्हाळे बालाजी कोकणे यांनी केले आहे.