
दैनिक चालु वार्ता ग्रामीण प्रतिनिधी -माणिक सुर्यवंशी
: देगलूर तालुक्यातील लख्खा ग्रामपंचायत कडून लख्खा येथील रहिवासी असलेली व अनेक महिलांचे महिला बचत गट तयार करून त्या महिलांना स्वावलंबी बनवणारी समुदाय संसाधन व्यक्ती (सि.आर.पी) सुनीता चंद्रकांत बोयावार हिला यंदाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासन व महिला व बाल विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा कर्तबगार महिलांना महाराष्ट्र राज्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालय स्तरावर सामाजिक कार्यात स्वतःला झोकुन देणाऱ्या दोन कर्तबगार महिलेची निवड करीत त्या दोन महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने देगलूर तालुक्यातील लख्खा ग्रामपंचायतच्या वतीने सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल येथील उमेद अभियान अंतर्गत महिला बचत गटाच्या समुदाय संसाधन व्यक्ती(सि.आर.पी) सुनीता रामचंद्र बोयावार सह महिला बचतगट अध्यक्षा ज्योती विलास काकेवार या दोन महिलांना येथील महिला सरपंच चंदरबाई बोयावार, ग्रामसेवक आर. एम. नुच्चे, उपसरपंच सूर्यकांत पा. मुंडकर यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हा पुरस्कार देऊन सन्मानाने गौरव करण्यात आले आहे.