
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
————————————- . नांदेड – येथील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय माणिक नगर नवीन / कौठा नांदेड या शाळेने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे द्वारा मार्च , फेब्रुवारी 2023 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेत घवघवीत यश प्राप्त करून शाळेची उज्वल देशाची परंपरा कायम ठेवून शाळेचा एकूण निकाल 92.10 टक्के त्यामध्ये 14 विद्यार्थी 90% पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. . शाळेतून एकूण विद्यार्थी विशेष प्राविण्यामध्ये 73 उत्तीर्ण झाले असून ग्रेड एक मध्ये 103 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ग्रेड दोन मध्ये 73 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत तर उत्तीर्ण ग्रेडमध्ये 31 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. . गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये सर्वप्रथम कुमारी चांदणे निवेदिता भगवानराव – 96.08 % द्वितीय क्रमांकावर राठोड अभय अर्जुन 95.40% तर तृतीय क्रमांक कुमारी वाढवे, रोहिणी भूषण 94.20% तसेच तृतीय क्रमांकावर कुमारी बनसोडे पूनम लक्ष्मण 94.20% यासोबतच कुमारी तेलंग अनुष्का प्रल्हाद 94.00 % , रासे कृष्णा विठ्ठल 94.00% , गोत्रम अभय गणेश 92.60 टक्के , पाटील ओम राजेश 92.40% , माडगे गजानन मारुती 92.20% , कुमारी कुर्लेकर प्रांजली गंगाधर 90.20 टक्के , पोलावर सोहम संजय 90.00%, राशी केदार रामदास 90.00% , कुमारी राठोड अस्मिता संजय 90.00% , नारळावर कृष्णा आनंद 90.00% गुण घेऊन विशेष प्राविण्यसह घवघवीत यश प्राप्त केले आहेत. . सर्व गुणवंत व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉ. पुरुषोत्तम केशवरावजी धोंडगे साहेब , संस्था सचिव ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी भाई गुरुनाथरावजी कुरुडे साहेब , सहसचिव मा. ऍडव्होकेट मुक्तेश्वर भाऊ केशवरावजी धोंडगे साहेब, संस्था कार्यकारणी सदस्य तथा शालेय समिती उपाध्यक्ष मा. प्रा. वैजनाथराव कुरुडे साहेब , अनुक्रमे शालेय समिती सदस्य मा. एम.पी. कुरुडे , माननीय सूर्यकांत कावळे सर व इंद्रजीत बुरपल्ले सर तसेच शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुधीर भाऊ कुरुडे , उपमुख्याध्यापक डी.पी.कदम , कॉलेजचे उपप्राचार्य श्री परशुराम येसलवाड , शाळेचे पर्यवेक्षक श्री सदानंद नळगे व श्री शिवराज पवळे , दहावीचे वर्गशिक्षक श्री व्यंकटराव उपासे , श्री योगेश भांगे , श्री राम गायकवाड श्री दत्तात्रय देवकते , श्री बालाजी ठिणगीकर परीक्षा विभाग प्रमुख सत्यवान पारेकर तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कौतुक केले.