
दैनिक चालु वार्ता उप संपादक धाराशिव-नवनाथ यादव
धाराशिव/भू म:- मा.नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष तथा उद्योजक प्रवीण रणबागुल यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे नुतन संचालक दत्तात्रय गायकवाड, पंचायत समितीचे माजी उपसभापती रामकिसन गव्हाणे, शेखर बोराडे, प्रदीप कांबळे सर,पत्रकार प्रमोद कांबळे, रोहिदास लोकरे, लक्ष्मण माने यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.