
दैनिक चालु वार्ता फुलवळ सर्कल प्रतिनिधी- नवनाथ वाखरडकर
आयशा शेख ने ९४.६०% गुण मिळवून प्रथम , वैशाली पटणे ने ९४.२०% गुण घेऊन द्वितीय तर क्षितिजा बसवंते ने ९३.२० % गुण प्राप्त करून तिसरा क्रमांक पटकावला. कंधार तालुक्यातील फुलवळ येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचा ९७ % एवढा निकाल लागल्याने विद्यार्थ्यांसह पालक व गुरुजनांत आनंदाचे वातावरण निर्माण होऊन समाधान व्यक्त केले जात आहे.
शाळेतून सर्वप्रथम येण्याचा मान आयशा लतीफ शेख हिने ९४.६०% गुण मिळवून प्राप्त केला आहे तर द्वितीय येण्याचा वैशाली आनंदा पटणे ने ९४.२०% गुण मिळवून घेतला असून क्षितिजा यादव बसवंते ने ९३.२० % गुण प्राप्त करून तिसरे स्थान पटकावले आहे.
सदर शाळेतुन एकूण ६५ विद्यार्थी एसएससी बोर्ड परिक्षेला बसले होते त्यापैकी ६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याविद्यार्थ्यांपैकी ८० टक्के चा टप्पा ओलांडणारे ३६ विद्यार्थी आहेत. तर ६० टक्केच्या पुढचे २३ विद्यार्थी आणि ३५ ते ६० टक्केच्या वर ४ विद्फुलवळ च्या श्री बसवेश्वर विद्यालय चा दहावी चा ९७ टक्के निकाल….!