
प्रतिनिधी मंठा सुरेश ज्ञा.दवणे
मंठा..अखिल भारतीय विद्यार्थी परिषद देवगिरी प्रदेश अभ्यासवर्ग दिनांक १६ ते १८ जून रोजी शिरपूर जि.धुळे येथील आर सी पटेल आश्रम शाळेत संपन्न झाला. अभ्यास वर्ग समारोप सत्रा मध्ये प्रांतातील जिल्हा प्रमुख व जिल्हा संयोजक यांच्या नावाच्या घोषणा करण्यात आल्या. अभाविप राष्ट्रीय कार्यकारी परिषद सदस्य डॉ सारंग जोशी यांनी संदीप गायकवाड यांची जालना जिल्हा संयोजक म्हणून जवाबदारी घोषित केली. मंठा जिल्हा जालना येथील रहिवासी *श्री संदीप गायकवाड* यांचे बीएससी पर्यंत शिक्षण मंठा येथे झाले आहे. ते मागील चार वर्षापासून विद्यार्थी परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. मंठा शहर मंत्री, तिरंगा यात्रा सहाय्यक, प्रदेश कार्यकारणी सदस्य, अभाविप जालना च्या विविध कार्यक्रम व आंदोलना मध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे. नियुक्ती निमित्त या ठिकाणी अभाविप प्रदेश अध्यक्ष प्रा डॉ सचिन कंदले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन संदीप गायकवाड यांना शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी कार्यकर्त्यांन सोबत चर्चा करताना संदीप गायकवाड म्हणाले, ” जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयात अभविपची सदस्यता करून सर्व विद्यार्थ्यांसी संवाद साधला जाईल. मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येक तालुक्यातून रथ यात्रा काढण्यात येईल. श्री शिवराज्याभिषेक त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येक महाविद्यालयात शिव अभिवादन करण्यात येणार आहे.”
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, शिवराज्याभिषेक ३५०, मराठवाडा मुक्ती संग्राम, विमर्ष अश्या अनेक विषयांवर शिरपूर अभ्यास वर्गा मध्ये मंथन करण्यात आले.
तीन दिवसीय या वर्गाला १६ जिल्ह्यातून विद्यार्थी, विद्यार्थिनी व प्राध्यापक कार्यकर्ते उपस्थित होते. दर वर्षी प्रमाणे शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीला प्रांतअभ्यास वर्ग मोठ्या उत्साहात संपन्न होत असतो. या प्रसंगी राष्ट्रीय कार्यकारीणी विशेष निमंत्रित सदस्य प्रा डॉ सारंग जोशी, प्रदेश अध्यक्ष प्रा. डॉ सचिन कंदले, प्रदेश मंत्री श्री नागेश गलांडे, जालना जिल्हा प्रमुख प्रा नाना गोडबोले, जालना शहर मंत्री श्री सागर मांडे व कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री संदीप गायकवाड यांच्या नियुक्तीचे जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.