केज मतदार संघात कोट्यावधी रूपयांची विकास कामे सुरू..
कामाची पाहणी करायला अधिकर्यांना नाही वेळ…
दैनिक चालु वार्ता
बीड जिल्हा प्रतिनिधीबालाजी देशमुख
बीड/अंबाजोगाई – येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांचा कारभार रामभरोसे सुरू असून कोट्यावधी रूपयांचे विकास कामे सुरू असताना ही त्याचा दर्जा पाहण्यासाठी अधिकार्यांना वेळ नसल्यामुळे निकृष्ठ दर्जाच्या कामाचा गुत्तेदारांनी सपाटा सुरू केला आहे. पधंरा-पंधरा दिवस अधिकारी कार्यालयाकडे फिरकत नसल्यामुळे नागरिकांना कार्यालयाची दरवाजे झिझवावी लागत आहेत. या सर्व प्रकारावरून बांधकाम विभागातील अधिकारी उंटावरून शेळ्या हाकत असल्याचे निर्माण झाले आहे.
अंबाजोगाई सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आखत्यारीत असलेल्या केज-धारूर- अंबाजोगाई-परळी, स्वाराती मेडीकल आणि माजलगाव या तीन विधानसभा मतदार संघात यांच्या विभागातील आमदारांनी आपआपल्या मतदार संघाचा विकास व्हावा आनुशेष शिल्लक राहू नये लोकांच्या मागणीनुसार रस्ते, सामाजिक सभागृह, प्रशासकीय इमारती यासाठी कोट्यावधी रूपयांचा निधी मंजुर करून आणला आहे. या कामाची पाहणी करायला. अधिकार्यांना वेळ नाही. मुळात अधिकारीच कार्यालयात व साईटवर येत नाहीत. त्यामुळे बोगस व दर्जाहिन कामाचा सपाटा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. केज विधानसभा मतदार संघात आ.नमिता मुंदडा यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून कोट्यावधी रूपयांचा विकास निधी मंजुर करून आणला. या निधीतून सामाजिक सभागृह, रस्ते व प्रशासकीय इमारती यांचा समावेश आहे. मोठ्या प्रमाणावर निधी मुंदडा यांनी आणल्यामुळे त्यांच्यावर जनता खुश आहे. तर मंजुर कामे सुमार दर्जाची निकृष्ठ व बोगस होत असल्याची सार्वजनिक बांधकाम विभागावर जनता नाखुश आहे. विशेषतः सिमेंट-कांक्रेटची कामे, नाली काम, संरक्षण भिंती, इमारती या कामात सिमेंट ऐवजी राख वापरली जात असल्याची चर्चा सुरू आहे. रस्ता कामात लोखंडी सळ्याचा वापर न करणे कमी जाडीच्या नाल्या बांधणे, कमी उंचीचे संरक्षण भिंती बांधणे, रस्ते कामात नदीतील गोठे, तसेच विशिष्ठ जाडीचा थर मंजुर असतानाही कमी जाडीचा थर बनविणे, डांबरी रस्त्यात डांबराऐवजी जळालेले ऑईल वापरणे असे प्रकार अंबाजोगाईच्या बांधकाम विभागात सुरू आहेत. मुळात ही सर्व कामे दर्जेदार होतील एवढा निधी आ.मुंदडा यांनी मंजुर करून आणला असतानाही केवळ ‘स्वामी भक्त’ गुत्तेदार पोसण्यासाठीच हा उठाठेव सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना मुख्यालयीन न राहता घरी बसायचा पगार देण्यासाठीच शासन पैसे मोजत आहे की काय? असा प्रश्न उपस्थितीत होत आहे. बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता (1), उपकार्यकारी अभियंता (6), अभियंता तीस, सह उपअभियंते आणि इतर कर्मचार्यांचा वर्ग मोठ्या प्रमाणावर असताना यातील मोजकेच अधिकारी, कर्मचारी, कार्यालयात येतात. काही अधिकारी पंधरा-पंधरा दिवस गायब होतात. त्यांच्या कार्यालयाला नेहमी टाळेच लागलेले असते. लोकसेवक असतानाही हे अधिकारी फोन उचलत नाहीत. पत्र व्यवहाराला उत्तर देत नाहीत. माहिती अधिकार गुंडाळून ठेवतात. एकुणच सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार ’राम भरोसे’ सुरू आहे.
स्वारातीचे उपविभाग नावालाच…
ग्रामिण भागातील जनतेसाठी जिवन वाहीनी ठरलेल्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामिण शासकीय वैद्यकीय रूग्णालय व महाविद्यालयासाठी बांधकाम विभागाचा स्वतंत्र उपविभाग आहे. या कार्यालयात अधिकारी उपलब्ध नसतात. बाहेर गावी राहूनच कार्यालय चालविले जाते. या कार्यालयाचे प्रमुख असून अडचण नसुन खोळंबा बनले आहेत. अत्यंत निकृष्ठ दर्जाचे कामे होत असल्याच्या तक्रारी होवू नये केवळ बघ्याची भूमिका घेवून हा उपविभाग कोणतीही ठोस कारवाई करत नाही. या मागे ‘अर्थ’दडला आहे.
लातूरहून चालतो बांधकाम विभागाचा कारभार
अंबाजोगाईतील बांधकाम विभागाचा कारभार मागील कित्येक वर्षापासुन लातूरमध्ये बसूनच चालतो त्या अधिकार्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक असतानाही कार्यकारी अभियंता व उपकार्यकारी अभियंता हे लातूरहून ये-जा करतात. कधी येतात आणि कधी जातात याची कल्पना देखील नसते. कार्यालयीन वेळेत कधीच हे अधिकारी दिसून आले नाहीत. यांच्यावर कायदेशिर कारवाई झाली पाहिजे- नितीन परदेशी, (तालुकाध्यक्ष मनसे विद्यार्थी सेना)
