
देव तारी त्याला कोण मारी
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) : तालुक्यातील हिरापुर गावात एक काळवीट आपल्या झुंडातून भटकुन गावात शिरले असता त्या काळवीटच्या मागे गावातील काही गावठी कुत्रे मागे लागले.त्याचवेळी काही कामानिमित्त गोपाल हरिराम उके हे ग्रामपंचायत मधून बाहेर पडत असताना काळवीटने त्यांचा आश्रय घेतल्याची आच्चर्याची बाब घडली व नंतर लगेच उकेंनी काळवीटच्या मागे लागलेल्या गावठी कुत्र्यांना हाकलून लावले.जणू काही देवाने उकेंना काळवीटचे प्राण वाचवण्यासाठीचं पाठवले.गावठी कुत्र्यांनी काळवीटवर केलेल्या हल्ल्यामध्ये काळवीट जखमी झाले होते.काळवीटला उपचार करण्याकरिता पकडण्याचा प्रयत्न केला परंतु ते परत गावाकडे सैरावैरा पळू लागले.जखमी झाल्यामुळे काळवीट अचानक खाली पडले.तोपर्यंत बरीच सामाजिक मंडळी गावात जमा झाली व त्या जखमी काळवीटवर प्राथमिक उपचार करून त्याला गावातीलच डॉक्टरांनी टिटनसचे इंजेक्शन लावून स्वस्थ केले व लगेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावले असता दोन तासात वनरक्षक वन विभागाचे वनरक्षक संगीता वरोकर,कैलास इंगळे हे घटनास्थळी पोहोचले व काळवीटला परतवाडा येथे नेण्यात आले.तोपर्यंत काळवीटला हिरापूर गावातील डॉ.नाना कावरे यांच्या घरी ठेवण्यात आले होते.डॉ.नाना कावरे,गोपाल उके,कृष्णा बर्डे,सौ.सुमनताई कावरे,मीराताई मेश्राम,ओम सोनवणे,वेदांत राऊत,डॉ.श्रीकांत कावरे, प्रफुल गायगोले,ऋषी उके,अर्णव फरकुंडे,किशोर बर्डे इत्यादिंनी काळवीटचे प्राण वाचविण्याकरिता यावेळी सहकार्य केले.