
दै.चालू वार्ता लातूर जिल्हा प्रतिनिधी
राठोड रमेश पंडित
लातूर: दिनांक २५ जून २०२३ रोजी धामनोद येथील लोडिंग पिक-अप गाडी हतनूर टोल नाक्या वरूण रात्रीच्या १२ वाजून ३० मिनिटाला औरंगाबादकडे जात आसतांना सदरील गाडीच्या फास्टटैग मधून नियमानुसार १७० रूपए कापले गेले.सदरची गाडी औरंगाबाद येथील भाजी मंडई मधे कोथंबीर खाली करूण परत पहाटे ४ वाजता हातनूर टोल नाक्यावर आली आसता तेथील कर्मचार्यांनी ड्राइवर लखन यांचेकडे ३५०० रूपयाची अवैधरित्या मागणी केली.तसेच ड्राइवरचा वाहन चावण्यांचा परवाना स्वतःकडे ठेऊन घेतला.
त्याच वेळी इतर हि तीन चार वाहनांकडे सदरील टोल कर्मचार्यांनी चुकिच्या पध्दतीने १००० ते ५०० रूपयाची अवैध वसूली करूण त्यांना सोडून देण्यात आले.
दरम्यान पाचोरा आगाराची बस एम. एच २० बी.एल ३९२३ पंढरपूर वरूण सकाळी ७ वाजून १५ मनिटाला हातनूर टोल नाक्यावर आली आसता तेथील कर्मचार्यांनी बस ड्राइवर संदिप पाटिल यांचेकडे पाचोरा पोलीस स्टेशनचा टोल माफीचा परवाना आसून देखील टोलसाठी पैशाची मागणी केली.
हातनूर टोल कर्मचार्यांशी मी फोन वर बोलण्याचे प्रयत्न केले आसता त्यांनी माझ्याशी बोलण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. त्या नंतर मी हायवेच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कल्पना राठोड मँडम यांचेशी संपर्क केला आसता राठोड मँडमनी कन्नड ग्रामीण पोलीसांशी संपर्क करूण ग्रामीणचे पोलीस हातनूर टोल नाक्यावर सकाळी ९ वाजून १५ मिनिटाला पाठवले व त्यांच्या समक्ष धामनोद येथील पिक – अप व्हाँनचे नियमानुसार ८० रूपये फास्ट टैग मधून कापल्या गेले.
कदाचीत हाच प्रकार जर धामनोदची गाडी औरंगाबादला जात आसतांना घडला आसता तर टोल कर्मचार्यांच्या आडमूठे धोरणा मुळे सदरची गाडी भाजी मंडई मधे पोहचण्यास उशीर झाला आसता व शेतकर्याच्या सर्व मालाचे नुकसान झाले असते आणि जर टोल कर्मचार्यांनी ३५०० रूपये दिले आसते तर गाडी मालकाला भाड्या मधून काय उरले आसते.
पाचोरा बस दि. २४ जून रोजी सकाळी ११ वाजता त्याच हातनूर टोल नाक्या वरूण मोफतचा पास पाहुन सोडण्यात आली होती.सदरच्या बस मधे परतीच्या प्रवासात एकूण २२ प्रवासी होते. त्या पैकी १४ वृध्द पुरूष व ४ महिला पण वृध्द होत्या.सदरील टोल नाक्या वरील कर्मचारी नेहमीच वाहन चालकों सोबत दादागिरी करत असतात. प्रसंगी हाणमार देखील करतात.प्रशासनाने जर वेळीच दखल घेऊन आशा गुंड प्रवृत्तींना आळा घातला नाहि तर भारत राष्ट्र समिती या पक्षाचे नेते व माजी आमदार श्री हर्षवर्धन जाधव व जय संघर्ष वाहन चालक, चालक – मालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व भारत राष्ट्र समितीचे सदस्य श्री संजय हाळनोर यांच्या नेतृत्वात तिव्र आंदोलन केले जाईल. याची प्रशासनाने दखल घ्यावी हि विनंती.