
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
देगलूर:भाजपा सत्तेत आल्या ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळेला मोठ्या प्रमाणात शिक्षक कमी असल्यामुळे विध्यार्थाच्या शिक्षणावर मोठा परिणाम होत असताना दिसून येत असून वर्ग जास्त शिक्षक मात्र कमी असी अवस्था जिल्हा परिषद विभागाची व शिक्षण विभागाची झाल्याचे स्पष्ट चित्र देगलूर तालुक्यातील खेड्यापाड्यात दिसून येत आहे
राज्यातले राज्य सरकार शिक्षक भरती करत नसल्यामुळे शिक्षकाचा मोठा शाळेवर शिक्षण देण्यासाठी तूटवडा निर्माण झाला असल्या चे वास्तव चित्र ग्रामीण भागात पाहाव्यास मिळत असून राज्य सरकारचा असा कारभार महत्वाच्या ठिकाणी जर शिक्षक कमी असतील विध्यार्थीना दर्जेदार शिक्षण मिळेल असा प्रश्न विध्यार्थाच्या पालकांतुन व्यक्त केला जात आहे
ग्रामीण भागातील शासकीय शाळा म्हणजे जिल्हा परिषद | शाळेला विध्यार्थी वर्ग मोठया प्रमाणात प्रवेश पूर्वी घेत होते परंतु शासन वर्गानुसार शिक्षक देत नसल्यामुळे शासकीयशाळेत आपल्या पाल्याना जिल्हा परिषद शाळेला प्रवेश देण्या ऐवजी थेट इंग्रजी शाळेत प्रवेश देत आहेत
जिल्हा परिषद शाळेत प्रवेश देण्यासाठी धजावत नाहीत शासनाने सदरच्या शासकीय शाळेवर कमीत कमी सात वर्ग सहा शिक्षक अशा पद्धतीने दिले तर विध्यार्थाना दर्जेदार शिक्षण मिळणार आहे.