दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
देगलूर:योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी या कार्यक्रमा निमित्त आज नांदेड येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत जन्मजात कर्णबधिर असलेल्या मा आमदार सुभाषराव साबने यांच्या देगलूर – बिलोली मतदार संघातील चि. पियुश योगेश बिरादार (वय 20 महिने) रा. केदारकुंठा ता. देगलूर येथील बाळाला कोक्लिअर इम्लांट या शस्त्रक्रिया करण्यासाठी रु. 5 लक्ष 20 हजार आर्थिक लाभ भेटल्या बद्दल चि. पियुश व त्याचीआई आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना धन्यवाद देण्यासाठी उपस्थित होते हे सर्व देगलूर – बिलोली मतदार संघाचे विकासपुरुष, कार्यसम्राट मा. आमदार सुभाषराव साबणे यांच्या प्रयत्नाने हे सर्व शक्य झाले आहे.
