
वाढदिवस साजरा न करण्याचे बाळासाहेब पा कऱ्हाळे यांचे कार्यकर्त्यांना आव्हान
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
लोहा कंधार विधानसभा मतदान संघाचे उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब पाटील कऱ्हाळे यांचा 2 जुलै रोजी वाढदिवस लोहा कंधार मतदारसंघात विविध उपक्रमांचे आयोजन करून मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो पण यावर्षी पेरणी पुर्व समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी अडचणीत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या आडी अडचणी सह अन्य समस्या जाणून घेणार असल्याचे बाळासाहेब पाटील कऱ्हाळे यांनी सांगितले आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणे शेतकऱ्यांना बि बियाणे वाटप तसेच ज्या शेतकऱ्यांना बॅंक कर्जमुक्त करत नाहीत त्यांच्यासाठी लढा देणे असा समाजउपयोगी उपक्रम राबण्याचे ठरविले आहे.
2 जुलै रोजी वाढदिवसाच्या दिवशी कोणीही पुष्पगुच्छ शाल हार फटाकेबाजी न करता कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना आवश्यक त्या वस्तू वाढदिवसाच्या निमित्ताने भेट स्वरुपात द्याव्यात असे आव्हान शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब पाटील कऱ्हाळे यांनी केले आहे.