
प्रा.अंकुश शिंदेचा कौतुकास्पद संकल्प
महाराष्ट्रातील लोकप्रिय पुरस्कार प्राप्त मोटिवेशनल ट्रेनर, लेखक, माझा स्टुडंट या साप्ताहिकाचे संपादक तथा प्रेरणादायी वक्ते अशी ओळख असलेले प्रा. अंकुश शिंदे हे छत्रपती संभाजीनगर शहरासह संपूर्ण महाराष्ट्राभर परिचित असणारे विचारवंत कार्यकर्ते आहेत. प्रा अंकुश शिंदे सरांनी स्वतःच्या वाढदिवसा निमित्त अवयव व देहदानाचा संकल्प केला आहे. ज्यांचे कार्य समाजहिताचे व सकारात्मक असते, अशा सर्व व्यक्तिनी चांगला ध्यास बाळगलेल असतो. प्रा. अंकुश शिंदे हेही अशाच उल्लेखनीय तथा दुर्मिळ व्यक्तिपैकीच एक असावेत ! प्रा. अंकुश शिंदे यांचा जन्मच सिद्धभूमीत झाला. हीं सिद्धभूमी म्हणजे वाशिम जिल्हयातील शिरपूर जैन ! पवित्र मातीत ते जन्मले म्हणून त्यांच्या कर्तृत्वाची प्रचिती ही सकारात्मक असल्याचे दिसून येते. अशा व्यक्ती सतत, चोवीस तास, क्षणोक्षणी चांगले कार्य करण्याचा, चांगले संकल्प तडीस नेण्याचाच विचार करत असतात.
अवयव व देहदानाचा प्रा. अंकुश शिंदे यांनी केलेला संकल्प उदात्त विचारांशी निगडित असलेला संकल्प आहे. देहदान काय म्हणजे काही तरीच, त्यात काय महत्त्व, त्यात काय वेगळेपण असा समज देखील काही जणांचा असू शकतो, पण देहदानाच्या संकल्पाचे महत्त्व मानवतावादी मंडळींना व वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींनाच कळू शकते, वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक नवीन पिढीला संशोधन करता यावे, वैद्यकीय क्षेत्रातून चांगले डॉक्टर्स घडावेत या दृष्टीने या देहदानाच्या संकल्याचे महत्त्व लक्षात येऊ शकते. विद्याज्ञान ज्ञानदान हे शिंदे सर करत आहेतच पण जीवन आणखी सार्थ ठरावे , आपण मरे पर्यंत विद्यार्थ्यांच्या कामाला येणार व मेल्यानंतर ही विद्यार्थ्यांच्या कामाला यावे म्हणून त्यांनी देहदानाचा ही संकल्प केलेला आहे. दूरदृष्टीचे सुसंस्कृत व्यक्तिमत्व कसे असते हेच या प्रा. अंकुश शिंदे सरांच्या निमिताने धोरेखित तर झालेले असते ! आयुष्याच्या अंतसमयी प्रा. अंकुश शिंदे सरांचा देह हा एखाद्या वैद्यकीय महाविद्यालयास प्राप्त झालेला असेलच, पण सध्याच्या स्थीतीत देखील हे प्रा. अंकुश शिंदे सर आपला देह विद्यार्थ्यांसाठी व आपल्या आई – वडिलांच्या सेवेसाठी राबवत आहेत, झिजवत आहेत. आपले चिरंजीव, आपले सुपुत्र आपली सेवा करत् आहे हा समाधानाचा भाव प्रा. अंकुश शिंदे सरांच्या आईवडीलांच्या चेह-यावरच उमटलेला असतो. सेवाभावी सुसंस्कृत सुपुत्रांची संख्या दुर्मिळ झालेली असताना प्रा. अंकुश शिंदे सरांकडून होत असलेली विद्यार्थ्यांची तसेच आई – वडिलांची सेवा नजरेत भरणारी आहे, उठून दिसणारी आहे. अशा सुसंस्कृत सुपुत्राचे देहदान हे सर्वांच्या दृष्टीने लाखमोलाचेच आहे. देहदानाची प्रेरणा इतर अनेकांना मिळो ही अपेक्षा…